Video: सलमान खानने माकडांना दिली बिस्किटांची मेजवानी

हा व्हिडिओ सलमानच्या फार्म हाऊसचा असून सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
Video: सलमान खानने माकडांना दिली बिस्किटांची मेजवानी
Video: सलमान खानने माकडांना दिली बिस्किटांची मेजवानी Instagram /@beingsalmankhan

बॉलीवुड अभिनेता सलमान खान ने (Salman Khan) आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये (Video) तो माकडांना बिस्किट खाऊ घालताना आणि त्याच्याशी बोलताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तो त्याच्या भाची आयतसोबत दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. माकडांना (Monkey) बिस्किटे दिल्यानंतर आयत खूप खुश दिसत आहे आणि टाळ्या वाजवताना दिसत आहे.

* भाचीला हातात घेवून सलमानने माकडांना मेजवानी दिली

सलमान खान आपल्या कुटुंबासोबत छान वेळ घालवत आहे. विशेषत: त्याची बहीण अर्पिताची मुलगी आयत हिच्याशी त्याचा विशेष संबंध आहे. सलमान आणि तीचा वाढदिवस एकाच दिवशी आहे. सलमानचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये तो माकडांना स्वत: बिस्किट खाऊ घालत्यांना दिसत आहे. त्यानंतर त्यांची भाची माकडाला बिस्किट देवून टाळ्या वाजवताना दिसत आहे. सलमान माकडांना केळीही खाऊ घालत आहेत. हा व्हिडिओ त्याच्या फार्म हाऊसचा असावा. त्याच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. सलमानने या व्हीडिओला मंकी असे कॅप्शन दिले आहे.

Video: सलमान खानने माकडांना दिली बिस्किटांची मेजवानी
लसीकरणासाठी आता भाईजान सरसावला

* सलमानच्या या चित्रपटांची फॅन्स वाट पाहत आहेत

सलमानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सध्या सलमान खान 'अंतिम' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत बहीण अर्पिताचा पती आयुष शर्माही आहे. अंतिमचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. महिमा मकवान या चित्रपटापासूनच बॉलीवुडमध्ये पदार्पण करत आहे. महिमा अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे. दरम्यान सलमान खान बिग बॉस सीझन 15 चे होस्टिंग देखील करत आहे. तसेच चाहते तीच्या टायगर 3 या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com