Salman Khan Viral Video: सतीश कौशिक यांच्या निधनानंतर भाईजान भावूक; पाहा व्हायरल व्हीडीओ

Salman Khan: सतीश कौशिक यांचे निधन आणि सलमानचे अश्रू याने चाहत्यांनादेखील हेलावून सोडले आहे.
Salman Khan
Salman KhanDainik Gomantak

Salman Khan: सतीश कौशिक यांच्या अचानक झालेल्या निधनाने बॉलीवूड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. हृदयविकाराने त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या अंतिमसंस्कारावेळी बॉलीवूडचे अनेक अभिनेते उपस्थित होते.

सलमान खानदेखील सतीश कौशिक यांच्या निधनानंतर अंतिमदर्शनासाठी आला होता. यावेळचा सलमान खानचा व्हीडीओ व्हायरल होत आहे.

सतीश कौशिक यांच्या निधनाने सलमानच्या डोळ्यात अश्रू तरळले असल्याचे दिसत आहे. एकीकडे सतीश कौशिक यांचे मित्र अनुपम खेर रडत होते तर दुसरीकडे सलमान खान आपले अश्रू लपवत असल्याचे दिसून आला.

Salman Khan
Bheed Trailer Release : लॉकडाऊनची भयाणता दाखवणारा 'भीड'...ट्रेलर रिलीज

सतीश कौशिक यांच्या अंतिम दर्शनासाठी शिल्पा शेट्टी , अनुपम खेर, शहनाज गिल, अभिषेक बच्चन देखील आले होते. सतीश कौशिक यांचे मनोरंजन क्षेत्रात बॉलीवूडमध्ये महत्वाचे योगदान आहे.

दरम्यान, सलमान खान( Salman Khan )च्या अनेक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे तेरे नाम हा चित्रपट होय. तेरे नाम या चित्रपटाच्या भूमिकेसाठी सलमान खानची निवड सतिश कौशिक यांनी केली होती. सतीश कौशिक यांचे निधन आणि सलमानचे अश्रू याने चाहत्यांनादेखील हेलावून सोडले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com