IIFA 2022 शो च्या वेळी सलमान खान रितेशवर झाला नाराज

बॉलिवूडचा दबंग सलमान खान आयफा 2022 ची शान वाढवण्यासाठी अबुधाबीला पोहोचला.
Salman Khan
Salman KhanDainik Gomantak

बॉलिवूडचा दबंग सलमान खान (Salman Khan) आयफा 2022 (IIFA 2022) ची शान वाढवण्यासाठी अबुधाबीला पोहोचला. 2 ते 4 जून दरम्यान चालणाऱ्या या कार्यक्रमात आणखी काही प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. गुरुवारी IIFA 2022 ची पत्रकार परिषद आयोजित केली गेली होती. सलमान खानसह रितेश देशमुख, मनीष पॉल, शाहिद कपूर, टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि इतर स्टार्स या शोमध्ये उपस्थिती लावली होती. (Salman Khan gets upset with Riteish Deshmukh during IIFA 2022 show)

Salman Khan
कोण आहे कमली? जिला मिळाला पाकिस्तानच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा टॅग, झाली ऑस्करची मागणी

शो दरम्यानची एक क्लिप व्हायरल होत आहे ज्यामध्ये सलमान खान रितेश देशमुखने त्याच्या होस्टिंगकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याच्यावर नाराज झाला होता. आता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) काय केले, ते आपण जाणून घेऊया. रितेश देशमुखने मनीष पॉलच्या होस्टिंग कौशल्याचे कौतुक करतानाचा हा संपूर्ण सीन तयार झाला. रितेश म्हणाला की- मनीष, मला सांगायचे आहे की, होस्टिंगसाठी घडलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तू आहेस. काही वेळातच सलमान खान थोडा नाराज झाल्याचे दिसून आले.

सलमान रितेश देशमुखकडे बोट दाखवत म्हणतो जणू त्यालाच सांगायचे आहे, माझे काय आहे विसरलास मला. त्यानंतर रितेश सलमानकडे येतो आणि म्हणतो- चूक माफ करा. मी अधूनमधून होस्टिंग देखील करत असतो. सलमान खानची ही बडबड आणि मस्ती भरलेली स्टाइल पाहून चाहते हसायला लागले. ही सगळी मजा चेष्टेमध्ये झाली होती. आणि यावेळी स्टेजवर उपस्थित सर्व स्टार्स सलमानची मस्ती पाहून हसायला लागले.

Salman Khan
karishma kapoor: करिश्मा कपूरचा ग्लॅमरस अंदाज

सलमान खानचे चाहते या व्हिडिओवर कमेंट करत आहेत आणि अभिनेत्याला बेस्ट होस्टचा टॅग देखील देत आहेत. यूजरने लिहिले की, सलमान भाई तुमच्यापेक्षा चांगले होस्टिंग कोणीही करू शकत नाहीये. दुसर्‍याने लिहिले की, बॉलिवूडचा राजा फक्त सलमान भाई. गुरुवारी सलमान खान आणि शाहिद कपूर यांनी आयफा मेटाव्हर्सचा लोगो जाहीर केला आहे. अभिनेत्याने आयफाचा भाग होण्याबद्दलचा त्यांचा उत्साह चाहत्यांना दाखवला आहे.

यंदा आयफामध्ये धमाका होणार आहे. बॉलिवूडमधील यंग जनरेशन मंचावर थिरकताना दिसणार आहे. प्रसिद्ध गायक हनी सिंग आयफामध्ये दिसून येणार आहे. हे सर्व 2022 मध्ये धमाकेदार पुनरागमन करण्यास तयार आहेत. हनी सिंग 1 नव्हे तर 10 गाणी यावेळी रिलीज करणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com