'या' प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी भाईजान पोहचला रणवीर सिंगकडे

आयफा ट्रॉफी शोधण्यासाठी सलमान खान रणवीर सिंगकडे पोहोचला!
salman khan And ranveer singh
salman khan And ranveer singhDainik Gomantak

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान कुठेही असला तरी त्याच्या जबरदस्त स्टाइलने थक्क करतो. रियॅलिटी शो असो वा कार्यक्रम, सलमान खान कुठेही असला तरी तो सर्वांच्या मनावर राज्य करतो. एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच तो एक उत्तम होस्ट देखील आहे. म्हणूनच वर्षानुवर्षे 'बिग बॉस'च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी डोक्यावर घेतली आहे. तो जे काही काम करतो ते मनापासून करतो. म्हणूनच एक टास्क पूर्ण करण्यासाठी सलमान खान रणवीर सिंगच्या बाथरूममध्ये पोहोचला. याचे कारण जाणुन घेउया. (salman khan knocks ranveer singh bathroom door funny moment iifa 2022)

आता तुम्ही विचार करत असाल की सलमान खानला रणवीर सिंगच्या बाथरुमचा दरवाजा ठोठावावा लागला. त्यानंतर असे काय घडले? वास्तविक, शनिवारीच कलर्सवर आयफा अवॉर्ड्सचे प्रसारण झाले. सुरुवातीलाच आयफा ट्रॉफी हरवल्याचे दाखवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत ही ट्रॉफी शोधण्याची जबाबदारी सलमान खानवर (Salman Khan) देण्यात आली आहे.

salman khan And ranveer singh
स्त्री आणि पुरुष कलाकारांमध्ये फरक का? विद्या बालनला पडलेय अनेक प्रश्न...

* आयफा ट्रॉफी शोधण्यासाठी सलमान खान पोहोचला रणवीर सिंगकडे !
ट्रॉफी शोधण्यासाठी सलमान खान वेगवेगळ्या सेलिब्रिटींना भेटतो. तो रणवीर सिंगपर्यंत ही जातो. सलमान खानचा हा संपूर्ण सीन एडिट करण्यात आला आहे. यामध्ये रणवीर सिंगचा सीन कपिल देव यांच्या बायोग्राफी 83 मधून घेण्यात आला आहे, ज्यामध्ये तो बाथरूममध्ये अंघोळ करत आहे. दुसरीकडे टीम सामना खेळत आहे. रणवीर सिंगचा हा व्हिडिओ (Video) एडिट करून सलमान खानच्या व्हिडिओमध्ये जोडण्यात आला आहे.

एडिट केलेलले सीन

सलमान खान रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) बाथरुमचा दरवाजा ठोठावत असल्याप्रमाणे एडिट करण्यात आला आहे. यानंतर सलमानने रणवीरला आयफा ट्रॉफी हरवल्याबद्दल प्रश्न विचारला. सलमान इतर सेलिब्रिटींनाही हाच प्रश्न विचारताना दिसतो. दुसरीकडे, तापसी पन्नूच्या दिलरुबा आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या शेरशाहमधील दृश्यांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com