Salman Khan: सलमानच्या भाचीची रॉयल एन्ट्री; नॅशनल अवॉर्ड विनर दिग्दर्शकाच्या फिल्मने करणार डेब्यू

Salman Khan: सलमान खानची भाची अलीजेह अग्निहोत्री बॉलिवुडमध्ये डेब्यू करत आहे.
Alizeh Agnihotri
Alizeh AgnihotriDainik Gomantak

Salman Khan: नविन आलेल्या अ‍ॅक्टरची डेब्यू फिल्म रीलीज झाल्यावर सगळीकडे चर्चा होते. पण सध्या बॉलिवुडमधील एका न्यु एन्ट्रीची जबरदस्त चर्चा आहे. तर ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून दबंग सलमान खानची भाची अलीजेह अग्निहोत्री आहे. लवकरच अलीजेह बॉलिवुड इंडस्ट्रीत आपले नशिब अजमावण्याच्या तयारीत आहे. मागील काही दिवसांपासून अलीजेह भलतीच चर्चेत होती.

सलमान खानच्या (Salman Khan) फॅमिली फंक्शनमध्ये अनेक वेळा ती दिसली पण ती नक्की कोण आहे? हा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण आता या गोष्टीचा उलगडा झाला आहे. अलीजेह ही सलमान खानची बहीण अलवीरा अग्निहोत्रीची लाडकी लेक आहे. अधिक माहितीनुसार, नॅशनल अवॉर्ड विनर सिनेमा निर्माता, दिग्दर्शक सौमेंद्र पाधी यांच्या फिल्ममधून अलीजेह बॉलिवुडमध्ये डेब्यू करत आहे. अलीजेहने या चित्रपटाची शुटींग पण सुरु केली आहे.

Alizeh Agnihotri
Alizeh AgnihotriDainik Gomantak
Alizeh Agnihotri
Vikram Gokhale Health Update: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक, पुण्यात उपचार सुरू

अलीजेहची ही पहिली फिल्म 2023 मध्ये रीलीज होणार असल्याचे बोलले जाते. या चित्रपटाचे दिग्दर्शक सौमेंद्र पाधी हे त्यांच्या पॉप्युलर कल्ट शो जमदाडा 1 आणि जमदाडा 2 साठी फेमस आहेत. हुशार आणि अष्टपैलू दिग्दर्शक अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे अलीजेहच्या मुख्य भुमिकेत असलेला हा त्यांचा चित्रपट कसा असेल? या विषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

दरम्यान, अलीजेहचे सोशल मीडियावर खूप सुंदर फोटो आहेत. ज्या फोटोंमध्ये ती खूप क्यूट आणि ग्लॅमरस दिसत आहे. खान फॅमिलीची सदस्य आता बॉलिवुडमध्ये (Bollywood) एन्ट्री करत असल्याने अलीजेहकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. मोठ्या पडद्यावर झळकण्याआधीच अलीजेहचा हॉट आणि ग्लॅमरस अंदाज पाहून ती इंडस्ट्रीत धुमाकूळ घालणार हे मात्र नक्की.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com