Salman Khan: 'जेव्हा जे व्हायचे आहे ते होणारच आहे'- असं का म्हणाला भाईजान

Salman Khan: सलमानच्या मॅनेजरला आलेल्या इ-मेलमध्ये गँगस्टार गोल्डी बराडसोबत बोलण्यासाठी सांगितले होते.
Salman Khan
Salman Khan Dainik Gomantak

Salman Khan: बॉलीवूडचा भाईजान सलमान खानला काही दिवसांपूर्वी इ-मेलद्वारे धमकी मिळाली होती. त्यानंतर सलमानच्या संरक्षणासाठी त्याच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. परंतु त्याच्या जवळच्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानला कोणत्याही धमकीचा काहीच फरक पडत नाही. त्याला खुलेपणाने आयुष्य जगायला आवडते.

बऱ्याच काळापासून सलमानवर मोठे संकट आहे. 2019मध्ये गॅंगस्टार लॉरेन्स बिश्नोईने जीवे मारण्याची धमकी दिली होती. आता सलमानच्या मॅनेजरला आलेल्या इ-मेलमध्ये गँगस्टार गोल्डी बराडसोबत बोलण्यासाठी सांगितले होते.

जर सलमान बोलला नाही तर मोठा झटका बसेल असेही या इ-मेल असे म्हटले आहे. धमकीच्या मेलनंतर मॅनेजरने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

Salman Khan
Ratna Pathak Shah: तुम्ही 3 महिन्याचे बाळ आहात का? कोणावर अन् का भडकल्या रत्ना पाठक शाह

दरम्यान, सलमानच्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, सलमान खान या सुरक्षाव्यवस्थेच्या विरुद्ध होता. त्याच्या म्हणण्यानुसार एवढी कडक सुरक्षा म्हणजे धमकी देणाऱ्याला जास्त महत्व देत आहेत.

जितके तुम्ही धमकीला घाबरुन सुरक्षा वाढवाल तितके त्याचा प्लॅन यशस्वी होईल असे म्हटले होते. जेव्हा जे व्हायचे तेव्हा ते होईल असे सलमान( Salman Khan )चे म्हणणे असते असेही त्यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com