Video: सलमान खान 'मैं चला' गाण्यात झळकणार रोमँटिक अंदाजात

सलमान खानचा नवा म्युझिक व्हिडीओ "मैं चला" या गाण्याला गुरु रंधावा याने आवाज दिला आहे.
Salman Khan
Salman Khan Dainik Gomantak

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानने (Salman Khan) अलीकडेच सोशल मीडियावर स्कार्फमध्ये गुंडाळलेला फोटो शेअर करून लोकांमध्ये कुतुहूल निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने त्या पोस्टमध्ये (Post) लिहिले कि तो लवकरच त्याच्या चाहत्यांसाठी काही नवीन घरून येणार आहे. सलमान आपल्या नव्या रोमँटिक म्युझिक व्हिडिओद्वारे (Music Video) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गुरु रंधावाने (Guru Randhawa) गायलेले "मैं चला" (Main Chala) या गाण्यात सलमान खान, अभिनेत्री -गायिका यूलिया वंतूरने (Lulia Vantur) आवाज दिला आहे. सलमान खानचे चाहते पुन्हा एकदा रोमँटिक अंदाजामध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहे.

सलमान खान (Salman Khan) एकीकडे त्याच्या अॅक्शन स्टाईलसाठी ओळखला जात असताना दुसरीकडे त्याच्या रोमँटिक स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. सलमान खानची हा नवा लुक अंतिम (Antim) या चित्रपटासारखी आहे. कारण त्या चित्रपटामध्ये तो पंजाबी भूमिका साकारताना दिसला होता पण या चित्रपटामध्ये तो अॅक्शन करताना दिसला होता आणि या म्युझिक व्हिडीओमध्ये तो रोमँटिक अंदाजामध्ये दिसत आहे. या गाण्याला यूलिया आणि गुरुने दिलेल्या आवाजमुळे या गाण्याची शोभा अधिक वाढली आहे.

Salman Khan
सूर्याचा ‘जय भीम’ थेट ऑस्करच्या शर्यतीत !

या गाण्यात सलमानसोबत प्रज्ञा जैस्वाल आहे. या दोघांची जोडी या गाण्यात सुंदर दिसत आहे. टी-सिरीजने हे गाणे आपल्या युट्यूब चॅनलवर (You Tube) रिलीज केले आहे. या गाण्याला संगीत शब्बीर अहमद यांनी दिले आहे तर दिग्दर्शन शबीना खान यांनी केले आहे. या गाण्याची निर्मिती सलमान खानने केली आहे.युलिया आणि गुरु चांगले मित्र आहेत यामुळे या गाण्याची चर्चा खूप होत आहे. एकप्रकारे सलमान या गाण्याच्या माध्यमातून युलियाचे प्रमोशन करत आहे.

'https://www.youtube.com/watch?v=65RzR2mAdwM'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com