Salman Khan New Business : बॉलिवूडचा हा सुपरस्टार मुंबईत बांधतोय हॉटेल...

अभिनेता सलमान मुंबईत 19 मजली घर बांधतोय..
Salman Khan New Business
Salman Khan New BusinessDainik Gomantak

अलीकडेच सलमान खान 'किसी का भाई किसी की जान'मध्ये बॉक्स ऑफिसवर दिसला, पण हा चित्रपट काही विशेष करू शकला नाही. दरम्यान, सलमान खान आणि त्याचे कुटुंब सी-फेसिंग हॉटेल उघडण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली आहे. होय,सलमानने एक मालमत्ता खरेदी केली आहे, ज्यावर त्याला एक आलिशान हॉटेल उघडायचे आहे. 

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, सलमान खान कार्टर रोड, वांद्रे येथे हे हॉटेल उघडण्याच्या तयारीत आहे. वृत्तानुसार सलमान आणि त्याचे भाऊ लवकरच नूतनीकरणाचे काम सुरू करून या व्यवसायाकडे वाटचाल करतील.

राहण्यासाठी घेतलेली जागा आणि आता हॉटेल

रिपोर्ट्सनुसार, ही इमारत १९ मजली आहे, ज्याला बीएमसीकडून मंजुरी मिळाली आहे. सलमान खान आणि त्याच्या भावांनी यापूर्वी या इमारतीत स्वत:साठी अपार्टमेंट खरेदी केली होती आणि सुरुवातीला निवासी मालमत्ता म्हणून त्याचे नूतनीकरण करण्याची योजना होती. 

मात्र, नंतर त्याने आपला प्लॅन बदलला आणि ते हॉटेल बनवण्याचा निर्णय घेतला. या इमारतीला हॉटेल बनवण्याचा प्रस्ताव वर्षभरापूर्वीचा आहे, ज्यामध्ये सलमान खानची आई सलमा खान यांचे नाव आहे. ती या मालमत्तेची मालक आहे.

असा असणार प्लॅन

सलमान खानचे आर्किटेक्ट सप्रे अँड असोसिएट्स यांनी न्यू डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन (DCPR 2034) अंतर्गत मध्यवर्ती वातानुकूलित आणि व्यावसायिक वापरासाठी या 69.90 मीटर इमारतीचा वापर करण्यासाठी अर्ज केला आहे. या इमारतीत तीन तळघर आहेत.  

नवीन योजनेनुसार पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर कॅफे आणि रेस्टॉरंट सुरू करता येतील. यासोबतच तिसऱ्या मजल्यावर जिम आणि स्विमिंग पूल असणार आहे. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर इतर सेवा, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर कन्व्हेन्शन सेंटर सुरू करण्याची योजना आहे. तर सातव्या ते १९व्या मजल्याचा वापर हॉटेलसाठी केला जाणार आहे.

जॉन अब्राहमचीही गुंतवणूक

प्रॉपर्टीमध्ये मोठी गुंतवणूक करणाऱ्या बॉलिवूड स्टार्सची यादी मोठी आहे. 2009 मध्ये अॅक्शन हिरो जॉन अब्राहमने प्रॉपर्टीमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. त्यांनी युनियन पार्कजवळ प्राइम लोकेशनमध्ये प्लॉट खरेदी केला होता.  सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे सध्या तिथं काहीही बनवण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही. केवळ गुंतवणुकीमुळे मालमत्ता खरेदी केल्याची बाब समोर आली

Salman Khan New Business
Bollywood Movie Release 2022: रुपेरी पडद्यावर रिलीज होणार हे 4 चित्रपट

राकेश रोशन यांनीही घेतली अपार्टमेंट

याशिवाय ऋतिक रोशन आणि त्याचे वडील राकेश रोशन यांनीही 2020 मध्ये मुंबईतील प्राइम लोकेशनमध्ये एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले होते. जुहू-वर्सोवा लिंक रोडजवळील निवासी टॉवरमध्ये त्याने तीन मजले खरेदी केले होते, ज्याची किंमत १०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. निवासी मालमत्तेव्यतिरिक्त, हृतिकने व्यावसायिक मालमत्तेतही मोठी गुंतवणूक केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com