सलमान खानचं मिडनाईट बर्थडे सेलिब्रेशन

दैनिक गोमन्तक
रविवार, 27 डिसेंबर 2020

अभिनेता सलमान खानने आपल्या कुटुंबियांसोबत आपला 55 वा वाढदिवस पनवेल येथिल आपल्या फार्महाऊसवर केक कापून साजरा केला.

मुंबई: सर्वांचा चहिता, राधे, सल्लू भाई, चूलबूल, पांडे, बॉडिगार्ड, प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा एक चेहरा म्हणजेच सलमान खान याचा आज 55वा वाढदिवस. अभिनेता सलमान खानने आपल्या कुटुंबियांसोबत आपला 55 वा वाढदिवस पनवेल येथिल आपल्या फार्महाऊसवर केक कापून साजरा केला. आणि मध्यरात्री केक कापून आपल्या फार्महाऊसच्या बाहेर येवून माध्यमांशी थोडक्यात संवाद साधला.

कोरोनाव्हायरस सर्व देशभर पसरला आहे साथीच्या या आजारापासून स्वत: चा बचाव करण्यासाठी सर्वांना हायजीन प्रोटोकॉल पाळण्याचा सल्ला सलमान खान ने त्याच्या चाहत्यांना दिला.

त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर, सलमानने आपल्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंट निवासस्थानाबाहेर एक नोटीस लावली होती आणि चाहत्यांना दरवर्षीप्रमाणेच बाहेर एकत्र न येण्याचा सल्ला दिला होता. “माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांचे माझ्यावर प्रेम खूपच वाढले आहे परंतु यावर्षी कोविड सर्व देशभर पसरलेला असल्याने सामाजिक अंतर ठेवण आवश्यक आहे. त्यामुळे घराबाहेर गर्दी करु नये ही माझी नम्र विनंती. मुखवटा पेहनो! हात साफ  करो! सामाजिक अंतर रखो! असं त्या नोटिसमध्ये लिहिेले होते.

आणखी वाचा:

सुप्रसिध्द मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर ३३ वर्षांनंतर उधळणार नृत्याचे रंग -

संबंधित बातम्या