गणेशाच्या आगमनापूर्वीच Salman Khan ने 'Antim' चे पोस्टर केले रिलीज
Antim: The Final Truth Poster Release Dainik Gomantak

गणेशाच्या आगमनापूर्वीच Salman Khan ने 'Antim' चे पोस्टर केले रिलीज

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) लवकरच त्याचा मेहुणा आयुष शर्मासोबत (Aayush Sharma) 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' (Antim: The Final Truth) या चित्रपटात दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) लवकरच त्याचा मेहुणा आयुष शर्मासोबत (Aayush Sharma) 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' (Antim: The Final Truth) या चित्रपटात दिसणार आहे. सलमान खान फिल्म्स प्रॉडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. तर दिग्दर्शक महेश मांजरेकर आहेत. त्याचवेळी, सलमान खानने अंतिम: द फाइनल ट्रुथ या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे.

गणेश चतुर्थीचा सण लवकरच येत आहे. हा सण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. अशा परिस्थितीत सलमान खानने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने ''अंतिम: द फाइनल ट्रुथ' ची पहिली पोस्ट रिलीज केली आहे. सलमान खानने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. सलमान खान आणि आयुष शर्मा अंतिमच्या पोस्टरमध्ये सोबत दिसत आहेत.

Antim: The Final Truth Poster Release
हेमा मालिनींनी रागाच्या भरात सोडला होता शो

पोस्टरमध्ये सलमान खान बाईक चालवताना दिसत आहे. त्याचबरोबर आयुष शर्माचा किलर लूकही पाहायला मिळत आहे. 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सलमान खान आणि आयुष शर्माच्या चाहत्यांना पोस्टर खूप आवडले आहे. यासोबतच ते कमेंट करून त्याचे कौतुकही करत आहे. चला 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' बद्दल बोलूया ही कथा प्रामुख्याने एका पोलीस आणि वेगवेगळ्या विचारसरणीच्या गुंडाभोवती फिरते.

विशेष गोष्ट म्हणजे सलमान खान आणि आयुष शर्मा हे एकमेकांसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. उल्लेखनीय आहे की 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' चित्रपटात अभिनेता वरुण धवन कॅमिओ करताना दिसणार आहे. वरुण धवन या चित्रपटात एक खास डान्स करणार आहे. अभिनेत्याचे चाहते याबद्दल खूप उत्सुक आहेत. पिंकविला या इंग्रजी संकेतस्थळाच्या बातमीनुसार, सलमान खान या आठवड्यात 'अंतिम' चित्रपटातील वरुण धवनचे गणपती गाणे रिलीज करणार आहे. वरुण धवनचा हा डान्स गणपतीवर आधारित असेल.

सलमान खान आणि 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' चित्रपटाच्या निर्मात्यांनी गणेश चतुर्थीचा सण लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.अंतिम: द फाइनल ट्रुथ हे चित्रपट, मुळशी पॅटर्न या मराठी चित्रपटाचे अधिकृत रुपांतर आहे. या चित्रपटात सलमान खान आणि आयुष शर्मासोबत प्रज्ञा जैसल, महिमा मकवाना आणि जिशु सेनगुप्ता देखील दिसणार आहेत.अंतिम: द फाइनल ट्रुथ हा चित्रपट प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com