'पुष्पा 2' मधून समांथा आऊट; सलमान खानची 'ही' नायिका करणार 'आयटम साँग'

समांथाच्या ऐवजी पुष्पा 2 मध्ये दिशा पटानीला कास्ट केली जाण्याची शक्यता आहे.
Pushpa 2 Movie news Updates, Samantha Ruth Prabhu, Pushpa 2 movie item songs Disha Patani
Pushpa 2 Movie news Updates, Samantha Ruth Prabhu, Pushpa 2 movie item songs Disha PataniDainik Gomantak

Samantha Ruth Prabhu: अल्लू अर्जुनचा पुष्पा या चित्रपटाने सर्वांनाच वेड लावले होते. या चित्रपटाची सुनामी संपूर्ण देशात आली होती. साऊथ दिवा समांथाने या चित्रपटात एक आयटम साँग सादर केले होते. समांथाने 'ऊ अंटवा' या गाण्यात आपले सौंदर्य दाखवून तिने चाहत्यांना घायाळ केले होते. पुष्पा चित्रपटाच्या यशानंतर आता लवकरच 'पुष्पा 2' येणार आहे. चाहत्यांना अपेक्षा होती की दुस-या भागात देखील सामंथाच्या (Samantha Akkineni) अदा पाहायला मिळतील. पण तसे होणे अशक्य वाटत आहे. (Pushpa 2 Movie news Updates)

Pushpa 2 Movie news Updates, Samantha Ruth Prabhu, Pushpa 2 movie item songs Disha Patani
Gold and Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या दर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समांथाच्या ऐवजी पुष्पा 2 मध्ये सलमान खानची (Salman Khan) नायिका कास्ट केली जाण्याची शक्यता आहे. आणि ती दुसरी-तिसरी कुणी नसून हॉट आणि सेन्सेशनल दिशा पटानी असू शकते. दिशाने आजवर अनेक गाण्यांमध्ये आपली अदाकारी दाखवली आहे. आता दिशाच्या नावावर शिक्कामोर्तब होते की निर्माते आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीला कास्ट करतात याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

दिशा पटानीबद्दल (Disha Patani) बोलायचे झाले तर तिचे अनेक बॉलिवूड चित्रपट रिलीज होण्याच्या मार्गावर आहेत. दिशाने तिच्या धमाकेदार डान्स मूव्ह्सनी अनेकवेळा चाहत्यांना स्वत:च्या प्रेमात वेडे केले आहे. दिशा तिच्या फिटनेससाठीदेखील ओळखली जाते. जर दिशाला पुष्पा 2 मध्ये एंट्री मिळाली तर ती तिच्या चाहत्यांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com