बॉलिवूडच्या चॉकलेट बॉयसोबत सामंथाला करायचाय रोमांन्स

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 24 मे 2021

‘द फॅमिली मॅन 2’ ही वेब मालिका 4 जून रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. या दरम्यान अभिनेत्री सामंथाने एका बॉलिवूडच्या हिरोला आपला फेवरेट म्हणून सांगितले आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा अक्किनेनी (Samantha Akkineni) अनेक चाहत्यांच्या मनावर राज्य करते. . सोशल मीडियावर कोट्यावधी लोक तिचे फॉलोवर्स आहेत. अभिनेत्री लवकरच मनोज बाजपेयी(Manoj Bajpayee)  अभिनीत ‘द फॅमिली मॅन 2’(The Family Man 2) या चित्रपटाद्वारे हिंदी चुत्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे. तीच्या या वेबसिरीजमुळे सध्या ती चर्चेत आली आहे आहे.(Samantha want to romance with Bollywoods chocolate boy Ranbir Kapoor)

नुकताच सामंथाच्या सिरिजचा ट्रेलर रिलीज झाला असून, तिच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे. ही वेब मालिका 4 जून रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. या दरम्यान अभिनेत्री सामंथाने एका बॉलिवूडच्या हिरोला आपला फेवरेट म्हणून सांगितले आहे.

कलाकारांच्या फोटो पोस्टवरती अन्नू कपूर भडकले

या स्टारबरोबर करायचा आहे रोमांन्स
वेबसिरीजमध्ये या अभिनेत्रीने तमिळ लिबरेशन फ्रंट एलटीटीई सदस्याची भूमिका साकारली आहे. अशा परिस्थितीत सध्या अभिनेत्री आपल्या वेबसीरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार नुकत्याच झालेल्या प्रमोशन दरम्यान सामंथाने खुलासा केला आहे की तीला बॉलिवूड चित्रपटांकडून अनेक ऑफर आल्या आहेत, परंतु भाषेच्या मुद्द्यांमुळे तीने या चित्रपटांना नकार दिला आहे.

37 व्या वर्षी श्रेया बनली आई; बॉलिवूडच्या या अभिनेत्रींना लग्नानंतर अनेक...

इतकेच नव्हे तर अभिनेत्रीने उघडपणे सांगितले आहे की, जर तिला बॉलिवूडचा चित्रपट मिळाला तर ती बॉलिवूडच्या एखाद्या प्रसिध्द अभिनेत्यासोबत ऑन स्क्रिन रोमांस करायला आवडणार. बॉलिवूड वृत्तानुसार अभिनेत्रीने हँडसम हंक रणबीर कपूरचे नाव घेतले आहे. म्हणजेच समंथा रणबीर कपूरसोबत काम करण्यास इच्छूक आहे असे दिसून येते. त्याच वेळी सामन्थाचे पती आणि दक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्य यांनी नुकतेच वेबसिरीजबद्दल अभिनेत्रीचे कौतुक केले आहे, परंतु तमिळ जनता संतप्त झाल्याचे दिसत आहे. रिलीजच्या आधी या मालिकेवर बरेच वादंग सुरू आहेत.

कंगनाचे केले कौतुक

काही काळापूर्वी, कंगनाचा आगामी चित्रपट थालाईवीचे पहिले गाणे रिलीज झाले होते, या गाण्यानंतर अभिनेत्री सामन्थाने कंगनाचे कौतुक केले होते. तीने ट्वीट करतांना, अम्माची अस्मित आणि त्यांच्या पडद्याआड आश्चर्यकारक गोष्टींविषयी सर्वांना माहिती आहे. मुख्यमंत्री होईपर्यंत त्यांच्या सिनेमातून होणाऱ्या आवाजाचे साक्षीदार व्हा. असे म्हटले होते. यानंतर, कंगनाने देखील अभिनेत्री संमंथाचे, आपण महिला सबलीकरणाचे प्रतीक आहोत, आपल्याला एकमेकींना सक्षम बनविणे आवश्यक आहे आणि तेच खरेस्त्रीत्व आहे, असे म्हणत तीचे आभार मानले होतोे.

संबंधित बातम्या