‘सेम टू सेम’ दिपिका ! हा पाकिस्तानी कलाकार आहे तरी कोण ?

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 2 मार्च 2021

मुस्तफाचा चेहरा दिपिकासोबत जुळत असल्याचं काही नेटिझन्सचं म्हणंण आहे.

मुंबई : सेम टू सेम' दिसणाऱ्या व्यक्ती अपवादाने पहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमधील अतिशय सुंदर अभिनेत्री एश्वर्या राय बच्चन सारख्या दिसणाऱ्या एक मुलीचा फोटो सोशल मिडियावर तूफान व्हयरल झाला होता. आता बॉलिवूडमधील अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्री दिपिकासारखी दिसणारी व्यक्ती समोर आली आहे. 

दिपिका पदुकोन सारखी दिसणारी व्यक्ती मुलगी नसून ती व्यक्ती पाकिस्तानातील प्रसिध्द अभिनेता फहाद मुस्तफा आहे. दिपिकासोबत त्याचा फोटो कोलाज केल्यास ते दोघेजण एकसारखे दिसत आहेत. दिपिकासोबत कोलाज केलेले अनेक फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मुस्तफाचा चेहरा दिपिकासोबत जुळत असल्याचा काही नेटिझन्सचं म्हणंण आहे. जर फहादच्या चेहऱ्यावरुन दाढी काढल्यास तर तो दिपिकासारखा दिसतो. मात्र काही नेटिझन्सनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. काही नेटिझन्सपैकी एकजण म्हणाला, ''कृपया हा फोटो काढून टाका मला खूप वाईट वाटत आहे. मात्र लगेच दुसरा नेटिझन्स म्हणाला, ''फहाद मुस्तफा हा दाढीतही दिपिकासारखा दिसतो.’’

चाहते पुन्हा पडणार गोविंदाच्या प्रेमात; 15 ते 16 गाणी स्वत:च लिहिली होती

दिपिका पदुकोनचा 83 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दिपिका तिचा पती रणवीर सिंह सोबत दिसणार आहे. 1983 मध्ये भारतीय संघाने लॉड्स मैदानावर विश्वचषक जिकंला होता. यावर हा चित्रपट आधारित आहे. या आधी दिपिका पदुकोन छपाक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

 

 

संबंधित बातम्या