Sameer Wankhede Controversy: समीर वानखेडेंना आज अटक होणार...कोर्टाने दिलेलं अटकेपासुनचं संरक्षण आज समाप्त

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा पाय आज आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे..
Sameer Wankhede Controversy
Sameer Wankhede Controversy Dainik Gomantak

Sameer Wankhede Controversy: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानवर ड्रग्ज प्रकरणात केलेली कारवाई आणि त्यात घेतलेली कथित लाच आता एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना चांगलीच भोवणार आहे. गेले कित्येक दिवस या प्रकरणावर चर्चा सुरू आहे.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या क्रुझवरच्या कारवाईने समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले होते. या कारवाईत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह मॉडेल मुनमुन धमेचा हिलाही अटक झाली होती.

अटकेपासुन संरक्षण आज समाप्त

समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी अटकेपासुन संरक्षणाची मागणी केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना दिलेलं हे संरक्षण आज संपत आहे. त्यामुळे आज समीर वानखेडे यांना अटक होण्याची शक्यता आहे.

गोसावी कोण?

क्रूजवरच्या कारवाईनंतर तपासात एनसीबीशी काहीही संबंध नसलेल्या केपी गोसावी या व्यक्तीला का सहभागी करुन घेण्यात आले? याही प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. न्यायालयात हाही मुद्दा विचारात घेतला जाईल.

Sameer Wankhede Controversy
Ram Gopal Varma On Kerala Story : "हा तर बॉलिवूडचा मेलेला चेहरा !" केरळ स्टोरीवर प्रसिद्ध दिग्दर्शकाचं मत

व्हॉट्सअप चॅटची माहिती एनसीबीला नाहीच?

दाखल केलेल्या याचिकेत समीर वानखेडे यांनी शाहरुख खानसोबत झालेलं व्हॉट्सअपचं चॅट कोर्टात सादर केलं होतं ;पण एनसीबीने सांगितल्याप्रमाणे त्यांना या चॅटची काहीही माहिती नाही.

धक्कादायक...कारवाईवेळचं सीसीटिव्ही फूटेज नाहीच

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानवर जेव्हा क्रूजवर अटकेची कारवाई झाली तेव्हा त्यावेळचे सीसीटिव्ही फुटेज उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. सध्या समीर वानखेडे CBI च्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.

या प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. या प्रकरणातले काही जबाब बघता समीर वानखेडे यांच्याकडे संशयाची सुई जाते. त्यातच आता समीर वानखेडे यांचं निलंबन होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे

पूजा ददलानीचा जबाब...

पूजा ददलानीने तिच्या रेकॉर्ड केलेल्या जबानीत कथित खंडणी स्वीकारली आहे. या प्रकरणात त्याने टोकन मनी म्हणून 50 लाख रुपयांची बॅग दिल्याचेही सांगण्यात येत आहे. इतकेच काय, हे सर्व कॉर्डेलिया क्रूझच्या छाप्याच्या काही तासांनंतरच घडले. 

एनसीबीच्या तपासानुसार, या प्रकरणात आर्यन खानचे नाव समोर आले तेव्हा अधिकाऱ्याकडून 25 कोटी रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली होती. मात्र नंतर 18 कोटी रुपयांत सौदा ठरला. त्यासाठी टोकन मनी म्हणून ५० लाख रुपयेही देण्यात आले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com