संजय दत्तच्या आगामी 'घुडछडी' चित्रपटाची घोषणा

रवीना टंडनसोबत दिसणार रोमान्स करताना
sanjay dutt announces upcoming film
sanjay dutt announces upcoming filmDainik Gomantak

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त सोशल मीडियावर क्वचितच सक्रिय असतो. आता त्याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर आगामी 'घुडछडी' या चित्रपटाची घोषणा केली आहे. अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करून चित्रपटाची घोषणा केली. उद्यानात बसून प्राणायाम करताना दिसत आहे, इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर करत त्याने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

sanjay dutt announces upcoming film
गरोदरपणातील 'ही' लक्षणे आई आणि बाळ दोघांसाठीही धोकादायक

बिनॉय गांधी दिग्दर्शित ‘घुडछडी’ या कॉमेडी ड्रामा चित्रपटाचे शूटिंग जयपूरमध्ये सुरू झाले आहे. या चित्रपटात संजय दत्त आणि अभिनेत्री रवीना टंडन हे 90 च्या दशकातील प्रसिद्ध जोडपे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपट निर्मात्यांनी असा दावा केला आहे की रोमांस आणि ड्रामाने परिपूर्ण हा चित्रपट रोलरकोस्टर राईड असेल.

संजय दत्तचा वर्कफ्रंट

तो लवकरच करण मल्होत्रा ​​दिग्दर्शित शमशेरा या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. शमशेरा चित्रपटाची कथा 1800 च्या उत्तरार्धावर आधारित आहे. रणबीर कपूर, संजय दत्त (sanjay dutt) आणि वाणी कपूर अभिनीत हा चित्रपट 18 मार्च 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. याशिवाय, अभिनेता केजीएफ चॅप्टर 2 या मोस्ट अवेटेड चित्रपटात (Movies) मुख्य खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 14 एप्रिल 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com