Sanjay Raut On Uorfi: उर्फी जावेद प्रकरणावरुन संजय राऊत म्हणाले उर्फीचे कपडे....

अभिनेत्री उर्फी जावेदच्या कपड्यांचा मुद्दा आता राजकारणाचा मुद्दा झाला आहे.
Sanjay Raut
Sanjay RautDainik Gomantak

राजकारणात कधी कोणता मुद्दा महत्त्वाचा ठरेल काही सांगता येत नाही. आता उर्फी जावेदच्या कपड्यांचा मुद्दा राजकारणात पुढे येत आहे.

एकीकडे शाहरुख खान आणि दीपिकाच्या 'पठाण' चित्रपटातील गाण्यावरून वादळ उठले असताना दुसरीकडे उर्फी जावेदच्या कपड्यांमुळेही खळबळ उडाली आहे. या दोन्ही मुद्द्यांवर भाजप नेत्या अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यावर आता संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. 

शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही या मुद्द्यांवरून भाजपवर निशाणा साधला आहे. राऊत म्हणाले, 'पठाणवर हल्ला करण्याची गरज नाही. उर्फीच्या कपड्यांवर मुंबईतील भाजप नेत्याने आक्षेप घेतला आहे. यापेक्षाही मोठे प्रश्न देशात आहेत. त्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी असे प्रश्न उपस्थित करू नका.

संजय राऊत म्हणाले की, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तिच्या कपड्यांविरोधात तक्रार करेपर्यंत उर्फी जावेदला कोणीही ओळखत नव्हते. पक्षाच्या मुखपत्राच्या 'रोखठोक' या साप्ताहिक स्तंभात संजय राऊत यांनी लिहिले आहे की, महाराष्ट्रातील राजकारण इतके टोकाला गेले आहे की, आता उर्फी जावेदच्या कपड्यांशिवाय कोणताही मुद्दा उरला नाही.

Sanjay Raut
Hot Scenes From Bollywood :आपल्या पहिल्याच चित्रपटात या अभिनेत्रींनी हॉट सीन्स देऊन आग लावली होती..

संस्कृतीच्या नावाखाली भाजपचे उर्फी जावेदचे मॉरल पोलिसिंग टाळता आले असते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यानंतर उर्फीचा मुद्दा शाहरुख आणि दीपिकाच्या आगामी 'पठाण' चित्रपटाशी जोडत राऊत म्हणाले, 'दीपिका पदुकोण विरुद्धचा राग फक्त तिच्या भगव्या बिकिनीसाठी होता का? 

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दीपिका पदुकोण जेएनयूमध्ये गेली, त्यामुळे भाजप नाराज झाला. मात्र आता त्यांनी दीपिकाच्या बिकिनीला मुद्दा बनवले आहे, तर भगव्या कपड्यात असणारे भाजपचे अनेक नेते अनेक अशोभनीय कृत्ये करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com