Sara Ali Khan: अमेझॉन प्राइम व्हिडिओने प्रदर्शित केला सारा अली खान अभिनीत आगामी चित्रपट 'ए वतन मेरे वतन'चा फर्स्ट-लुक

अमेझॉन प्राइम व्हिडिओने नुकताच 'ए वतन मेरे' चित्रपटाचा फर्स्ट-लुक नुकताच प्रदर्शित केला आहे
Sara Ali Khan
Sara Ali KhanDainik Gomantak

Actress Sara ali Khan : सारा अली खान ही अल्पावधीत नाव मिळवलेली अभिनेत्री आहे. काही मोजक्याच पण उल्लेखनिय चित्रपटांतुन तिने आपले नाव कमावले आहे. साराचा चाहतावर्ग मोठा आहे. तसेच, आपल्या विविध व्यक्तिरेखांनी साराने दर्शकांची मने नेहमीच जिंकली आहेत.

सध्या सारा तिच्या एका चित्रपटाच्या निमित्ताने चर्चेत आहे. सारा अली खानचा(Actress Sara ali Khan) आगामी चित्रपट 'ए वतन मेरे वतन'चा फर्स्ट लूक सोमवारी रिलीज करण्यात आला. एका छोट्या टीझरमार्फत 'ए वतन मेरे वतन'या सिनेमा ची घोषणा करण्यात आली.

या थ्रिलर ड्रामा चित्रपटाच्या टिझरमध्ये सारा हळूच एका अंधाऱ्या खोलीत येते, आणि रेडिओ सारखं दिसणारं यंत्र सुरू करून बोलायला सुरू करते. स्वातंत्र्यपूर्व काळातील ‘भारत छोडो’ आंदोलनाचे संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात, आणि एवढ्यात तिच्या घराचे दार ठोठावल्याचा आवाज येतो.

'ए वतन मेरे वतन'हा सिनेमा सत्य घटनांनी प्रेरित असून, ही कथा मुंबईतील महाविद्यालयात शिकणाऱ्या एका धाडसी तरुणीची आहे जी पुढे जाऊन स्वातंत्र्यसैनिक बनते. तसेच, यामध्ये आपल्याला १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाची पार्श्वभूमी पाहायला मिळणार आहे.

Sara Ali Khan
Tu Jhoothi Mai Makkar Trailor: 'तू झूठी मैं मक्कार' चं ट्रेलर रिलीज...चित्रपटाच्या नावाप्रमाणेच ट्रेलरही अतरंगी...

धर्मा एंटरटेनमेंट प्रोडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण जोहर आणि अपूर्व मेहता यांनी केली असून सोमेन मिश्रा यांनी सह-निर्मिती केली आहे. सत्य घटनांपासून प्रेरित आहे.

या थ्रिलर ड्रामाचे दिग्दर्शन कन्नन अय्यर यांनी केले असून दरब फारुकी आणि कन्नन अय्यरद्वारा लिखित या चित्रपटात सारा अली खान एका धाडसी स्वातंत्र्य सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'ए वतन मेरे वतन' जगभरातील 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम सदस्यांसाठी उपलब्ध होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com