Satish Kuashik Death : सतीश कौशिक मृत्यू प्रकरणाला गूढ वलय...दिल्ली पोलिसांचा तपास गतिमान

अभिनेते सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणाला आता गूढ वलय मिळाले आहे.
Satish Kaushik
Satish KaushikDainik Gomantak

अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन होऊन काही तास लोटले असताना आता त्यांच्या मृत्यू प्रकरणाला गूढ वलय प्राप्त झालं आहे. आता या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत.  सतीश कौशिक यांचा दिल्लीतील रुग्णालयात मृत्यू झाला आहे. आता दिल्ली पोलिसांचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. सतीश कौशिक यांना शेवटच्या क्षणी भेटलेल्या लोकांची चौकशी केली जाऊ शकते. त्याचबरोबर पोस्टमार्टम रिपोर्टचीही प्रतीक्षा आहे. 

यापूर्वी सतीश कौशिक यांचे दिल्लीतील दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, त्यांचा मृतदेह दिल्लीहून एअर अॅम्ब्युलन्सद्वारे मुंबईला नेण्यात येणार आहे. सतीश कौशिक यांच्यावर मुंबईतच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दरम्यान, दिल्ली पोलीस अभिनेत्याच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणात 7 आणि 8 तारखेला काय केले हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचे कार्य काय होते? सतीश कौशिक यांची तब्येत बिघडलेल्या फार्म हाऊसवर किती वाजता पोहोचले या सर्वांचा तपास होणार आहे.

ते कोणाला भेटले आणि तिथे काय घडले, सतीश कौशिक यांना रुग्णालयात नेणारे लोक होते, हेही पोलिस जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसही त्यांच्या संपर्कात आहेत. दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक तपासात काहीही संशयास्पद वाटत नाही.

Satish Kaushik
Tu Jhoothi Main Makkar Day 1: 'तू झूठी मै मक्कार' ची पहिल्या दिवसाचा गल्ला जोरदार

विशेष म्हणजे सतीश कौशिक यांना रुग्णालयात नेण्यापूर्वी पोलिसांना माहिती देण्यात आली नव्हती. त्याचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयात याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. 

सतीश कौशिक यांच्या शवविच्छेदन अहवालावर सूत्रांनी सांगितले की, त्यांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या खुणा आढळल्या नाहीत. त्याचवेळी, प्राथमिक तपासात मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे मानले जात आहे. पण आता पोलिसांच्या भूमीकेमुळे हे प्रकरण काहीतरी वेगळे असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com