Satish Kaushik Death Case: 'माझ्या पतीचा मृत्यू...'- सतीश कौशिक यांच्या मृत्यूबाबत पत्नीचे वक्तव्य

Satish Kaushik Death: 15 करोड रुपयांवरुन वाद चालू होता.
Satish Kaushik Wife Reaction on Death
Satish Kaushik Wife Reaction on DeathDainik Gomantak

Satish Kaushik Death Case: सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे गूढ आता वाढत असल्याचे दिसून येत आहे. सतीश कौशिक यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाले असल्याचे समोर आले होते. मात्र त्यांच्या अवघ्या काही तासानंतर त्यांचा मृत्यू नसून त्यांच्यासोबत घातपात झाल्याची माहिती मिळाली होती.

विकास मालू नावाच्या बिझनेसमॅन आणि सतीश कौशिक यांच्यात 15 करोड रुपयांवरुन वाद चालू होता.

विकास मालू यांची पत्नी सान्वी मालू यांनी दिल्ली पोलिसांना लिहलेल्या पत्रात माझ्या पतीने सतीश कौशिक यांचा 15 करोड रुपए परत द्यावे लागू नये म्हणून सतीळ कौशिक यांना चुकीच्या गोळ्या दिल्या असू शकतात.

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी असेही सान्वी या पत्रात म्हटले होते. सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे गूढ कायम असताना आता त्यांच्या पत्नीने याबाबत वक्तव्य केले आहे. सतीश कौशिक यांचा मृत्यू 15 करोड रुपयांसाठी होणे शक्य नाही .

Satish Kaushik Wife Reaction on Death
Kangana Ranauat: कंगणाचे अकाऊंट हॅक झाले की काय? दीपिकाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांची अजब प्रतिक्रिया

विकास मालू आणि सान्वी मालू आता एकत्र राहत नसल्याने सहानभुती मिळवण्यासाठी सान्वी मालू अशा प्रकारची वक्तव्ये करत असल्याचे म्हटले आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये 98 टक्के ब्लॉकेज असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, विकास मालूवर आरोप झाल्यानंतर विकास मालूने आपली बाजू स्पष्ट करताना सतीश कौशिक गेल्या 30 वर्षापासून माझे कुटुंब होते असे म्हटले आहे.

आता पोलिसांच्या तपासात सतीश कौशिक यांच्यामृत्यू प्रकरणात काही संशयास्पद सापडणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com