
सत्यजीत रे (Satyajit Ray) यांनी आधुनिक चित्रपट सृष्टीचा पाया रचला असे मानले जाते. यांची आज म्हणजेच 2 मे रोजी 101 वी जयंती आहे. सत्यजित रे यांना पद्मश्री, भारतरत्न आणि ऑस्कर या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आज अनेक युवा चित्रपट निर्माते त्यांचे चित्रपट पाहून प्रेरित होतात. (Satyajit Ray Birth Anniversary News)
सत्यजीत रे यांना 32 शासकीय पुरस्कारांनी (Award) सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांना 30 मार्च 1992 रोजी को ‘ऑनररी लाइफटाइम अचीव्हमेंट अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले होते. त्यांचे पाच प्रसिद्ध चित्रपट कोणते हे जाणून घेऊया.
* अपू ट्रॉयोलॉजी
हा चित्रपट तीन भागांमध्ये तयार करण्यात आला. पहिला भाग होता पाथेर पांचाली, दुसरा भाग अपराजितो आणि तिसरा भाग 'द वर्ल्ड ऑफ अपू' असा होता. या सर्व भागांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. या चित्रपटामुळे भारतीय चित्रपसृष्टीला इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर विशेष ओळख मिळाली.
* महानगर
या चित्रपटामध्ये 'सत्यजीत रे' यांनी मोठ्या शहरांमधील लोकांची जीवन जगण्याची शैली दाखवली आहे. महिला (women) ऑफिसमधील काम पाहून घर देखील कशा पद्धतीने सांभाळतात, हे या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहे.
* चारुलता
महिलांना जाणवणारा एकटेपणा, या विषयावर या चित्रपटाचची कथा आधारित आहे.
* आगंतुक
हा सत्यजीत रे यांचा शेवटचा चित्रपट आहे. उत्पल दत्त यांनी या चित्रपटामध्ये (Movie) प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटामधील डायलॉग आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
* शतरंज के खिलाडी
सत्यजीत रे यांनी त्यांच्या करिअरमध्ये एकाच हिंदी चित्रपटाची निर्मिती केली. 'शतरंज के खिलाडी' या त्यांच्या हिंदी चित्रपटाचे कथानक हे अवधचा शेवटचा सम्राट 'अली शाह' याच्यावर आधारित आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.