सत्‍यजीत रे यांचे सिनेमा आजही प्रेरणादायी: गंगा मुखी

भारतीय सिनेमांना (films) स्वत:ची एक खास शैली असायला हवी. याच विचारसरणीवर सत्यजीत रे यांनी काम केले.
सत्‍यजीत रे यांचे सिनेमा आजही प्रेरणादायी: गंगा मुखी
Satyajit Ray's movies are still inspiring todayDainik Gomantak

पणजी: भारतीय सिनेमांना (films) स्वत:ची एक खास शैली असायला हवी. याच विचारसरणीवर सत्यजीत रे यांनी काम केले. आणि या विचारसरणीवरच आधारीत तयार केलेले सिनेमा आजच्या सिनेनिर्मात्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत, असे मत फिल्म अॅण्ड टेलिव्‍हिजन इन्‍स्‍टिट्यूट इंडियाची पटकथा लेखन विभाग साहाय्यक प्राध्यापिका गंगा मुखी यांनी आभासी माध्यमाद्वारे घेतलेल्या मास्टर क्लासमध्‍ये व्यक्त केले.

Satyajit Ray's movies are still inspiring today
महिलांच्या धाडसाचे कौतुक करणारा ‘द स्पेल ऑफ पर्पल’

सिनेमानिर्मितीचा कोणताही अभ्यास सत्यजीत रे यांनी केला नाही. मात्र त्यांच्या सिनेमाचा गोडवा अजूनही कायम आहे. त्यांच्या सिनेमांतून आजही मार्गदर्शन मिळते असे गंगा म्‍हणाल्‍या. रे यांनी त्यांच्या सिनेमांतून प्रेक्षकाच्या काळजाला हात घातला. सिनेमांतून विविध विषय हाताळून ते उत्तमरित्या मांडले असेही त्या म्हणाल्या. यावेळी गंगा यांनी सिनेमांशी निगडीत विविध तंत्राविषयी मार्गदर्शन केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com