IFFI 21 Nov Schedule: दृश्यम-2, RRR, इंडिया लॉकडाऊनसह सोमवारी इफ्फीत विविध चित्रपटांची मेजवानी

सोमवारपासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगभरातील उत्कृष्ठ आणि उत्कंठार्धक चित्रपच पाहण्याची संधी सिनेरसिकांना उपलब्ध होणार आहे.
IFFI 21 Nov Schedule
IFFI 21 Nov ScheduleDainik Gomantak

IFFI 21 Nov Schedule: भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला रविवारपासून गोव्यात सुरूवात झाली आहे. तालेगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम येथे चित्रपट महोत्सवाचा भव्य दिव्य उद्धाटन समारंभ पार पडला. या समारंभाला बॉलिवूडसह हॉलिवूडमधील कलाकार, चित्रपट निर्माते, दिग्दर्शकांनी उपस्थिती लावली. सोमवारपासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगभरातील उत्कृष्ठ आणि उत्कंठार्धक चित्रपच पाहण्याची संधी सिनेरसिकांना उपलब्ध होणार आहे.

IFFI 21 Nov Schedule
IFFI Goa: इफ्फीच्या रेड कार्पेटवर बॉलिवूडचं ग्लॅमर

सोमवारी काही उत्कृष्ठ चित्रपट पाहण्याची संधी

दृश्यम-2

चित्रपट महोत्सवात सोमवारी सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत असलेला अजय देवगण, तब्बू आणि अक्षय खान्ना यांचा दृश्यम-2 चित्रपट पाहता येणार आहे. पणजी येथील आयनॉक्स कलादालन (एक) येथे सांयकाळी 7:30 वाजता दृश्यम-2 सुरू होणार आहे.

आरआरआर

एसएस राजमौली यांची सुपरहीट आरआरआर चित्रपट पणजी येथील आयनॉक्स कलादालन (एक) येथे संध्याकाळी आठ वाजता सुरू होणार आहे.

इंडिया लॉकडाऊन

मधुर भंडारकर यांचा इंडिया लॉकडाऊन हा चित्रपट मॅकेनजी पॅलेस येथे सांयकाळी 7:30 वाजता पाहता येणार आहे.

IFFI 21 Nov Schedule
Bollywood In IFFI Goa: इफ्फीत सिनेकलाकारांचा जलवा

इतर देशातील अनेक चित्रपट

याशिवाय इतर देशातील अनेक चित्रपट सोमवारी सिनेरसिकांना पाहता येणार आहेत. पणजीतील आयनॉक्सच्या चार स्क्रीन, मॅकेनजी पॅलेस येथे एक स्क्रीन आणि पर्वरी येथील आयनॉक्सच्या चार स्क्रीन तब्बल 39 चित्रपट दखवले जाणार आहेत. चित्रपटांचे सविस्तर वेळापत्रक इफ्फीचे वेळापत्रक इफ्फीच्या अधिकृत संकेस्थळावर उपलब्ध आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com