"सायन्स थ्रू माय आईज" ही फोटो व सिनेमा स्पर्धेचे आयोजन

PIB
बुधवार, 1 जुलै 2020

दि. 30 जून 2020 सकाळी 11 वाजल्यापासून ते 15 जुलै 2020 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे कधीही प्रवेशिका पाठवता येतील.

नवी दिल्ली,

इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी (INSA) आणि विज्ञान तंत्रज्ञान संशोधन मंडळ (SERB) यांनी मिळून फोटो/ चित्र व एक मिनिटाची फिल्म याची स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचा हेतू लोकांनी त्यांच्या नजरेच्या (परिघाकडे) पलीकडे जाऊन विज्ञानाकडे बघावे, समजून घ्यावे आणि त्याचे कौतुक करावे हा आहे. अशा गंभीर नजरेने विज्ञानाकडे पाहिल्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाला उत्तेजन मिळून आणि संशोधनाची आवड उत्पन्न होईल, तसेच सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळेल.

या स्पर्धेची संकल्पना 'विज्ञान माझ्या नजरेतून' (Science through My Eyes) ही आहे. या अंतर्गत कोणतीही उपसंकल्पना निवडता येईल. प्रयोगशाळेतील विज्ञान, स्वयंपाकघर, क्रीडा, रुग्णालय, अथवा कार्यस्थळ या स्पर्धेसाठी दिलेल्या काही उपसंकल्पना आहेत. 'सायन्स थ्रू माय आईज'साठी निर्मिती करताना कोविड-19चा विषाणू, आरोग्यपूर्ण जीवन, भौगोलिक वारसा, आरोग्य, मोहक अंतराळ यापैकी कोणत्याही उपसंकल्पनेवर सर्जन करता येईल.

यावेळी बोलताना 'डीएसटी'चे सचिव प्रा. आशुतोष शर्मा म्हणाले, की विज्ञानाची लोकशाही (सर्वत्र, सर्वांसाठी विज्ञान)  म्हणजे 'डेमोक्रेटायझेशन ऑफ सायन्स', 'थ्रू सायन्स एव्हरीवेअर अँड सायन्स फॉर ऑल' ही संकल्पना, सक्तीची असून, समाजात मोठ्या प्रमाणावर वैज्ञानिक प्रवृत्तीच्या उच्चस्तराचा विकास करण्याचे महत्वाचे साधन आहे; तसेच ती  तरुणाईला प्रेरणा व नाविन्यपूर्ण ज्ञान देऊन आत्मनिर्भर भारताच्या संरक्षक व आर्थिक गरजा, तसेच विकासात महत्वाचा वाटा उचलेल.

ही स्पर्धा केवळ भारतीयांसाठीच आहे. त्यात सहभागी होण्यासाठी प्रवेशशुल्क नाही. 1. डॉक्टरल विद्यार्थी PhD आणि कोणत्याही शाखेतील पोस्ट डॉक्टरल फेलोज 2. अथवा वैद्यकीय, सर्जरी वा मेडिसीन MBBS, MS, MD, MTech, MBA 3. कार्यरत शास्त्रज्ञ, अथवा वैद्यकीय व्यावसायिक, इंजिनिअर, तांत्रिक कर्मचारी, सिनेनिर्माते, साहाय्क वैद्यकीय कर्मचारी, अशा तीन गटात प्रवेशिका पाठवता येतील. दोघेजण (दोघांचा संघ) मिळून देखील यात भाग घेऊ शकतील. प्रवेशिका वैयक्तिक वा दोन व्यक्तिंचा गट अशा स्वरुपात पाठवता येतील. 
 

 

संबंधित बातम्या