‘वर्क इन प्रोग्रेस’ साठी पाच सिनेमांची निवड
‘वर्क इन प्रोग्रेस’ साठी पाच सिनेमांची निवड Dainik Gomantak

‘वर्क इन प्रोग्रेस’ साठी पाच सिनेमांची निवड

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षाप्रमाणे या वेळीसुद्धा हा विभाग ऑनलाईन माध्यमातून घेण्यात येईल.

पणजी: ‘एनएफडीसी’तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या फिल्म (Film) बाझारच्या वर्क इन प्रोग्रेस लॅब या विभागाच्या माध्यमातून यंदा पाच सिनेमांची निवड करण्यात आली असल्याची अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या (Corona) पार्श्वभूमीवर मागील वर्षाप्रमाणे या वेळीसुद्धा हा विभाग ऑनलाईन (Online) माध्यमातून घेण्यात येईल.

आसाम, छत्तीसगढी, हिंदी कन्नड, मराठी आणि मोरान या भाषांतील सिनेमा या दरम्यान दाखविण्यात असून सर्व सिनेमा फीचर सिनेमा असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

‘वर्क इन प्रोग्रेस’ साठी पाच सिनेमांची निवड
गोव्यात आजपासून सिनेमोत्सव,सिनेताऱ्यांची मांदियाळी

2008 सालाहून सुरू करण्यात आलेल्या या विभागातून भविष्यातील आगामी सिनेमा निर्माते, तसेच सिनेसृष्टीस जोडलेल्या अन्य जणांसााठी चित्रपट निर्मितीपासून सिनेसृष्टीच्या विविध अंगाविषयी सिनेमा निर्मितीतील आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ, सिनेमा निर्माते, क्रीटक्स, फील्म एडीटर्स या दरम्यान मागदर्शन करणार आहेत. त्यामुळे हा विभाग नेहमीच सिनेसृष्टीत नव्याने पाऊल ठेवणाऱ्या व्यक्तींना प्रेरणादायी ठरला आहे.'बागजान' सिनेमाचे निर्माते जयचेंद धोतीया असून हा सिनेमा आसामी आणि मोरान भाषेत आहे. 'बेलादिला' सिनेमाचे निर्माते शैलेंद्र साहु असून हा सिनेमा हिंदी आणि छत्तीसगढी भाषेत आहे. 'एक जगह अपनी' सिनेमाचे निर्माते एकतरा कलेक्टीव्ह असून हा सिनेमा हिंदी भाषेत आहे. शिवम्मा सिनेमाचे निर्माते जय शंकर असून हा सिनेमा कन्नड भाषेत आहे. फॉलोवर सिनेमाचे निर्माते हर्षद नलावडे असून हा सिनेमा मराठी, कन्नड आणि हिंदी भाषेत आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com