ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण काळाच्या पडद्याआड

प्रेमा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ही केला होता प्रवेश
ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण काळाच्या पडद्याआड
Prema KiranDainik Gomantak

मुंबई : अनेक मराठी चित्रपटात विविध भूमिका साकारून मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेम किरण यांचं हृदयविकाराच्या झटक्याने मुंबई येथे निधन झालं. त्या ६१ वर्षांच्या होत्या. प्रेमा यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. (Senior Marathi actress Prema Kiran passes away )

Prema Kiran
जॅकलिनची करोडोंची संपत्ती गुल! 9 लाखांच्या मांजरी तर 52 लाखांचा 'घोडा'

८० ते ९० च्या दशकात प्रेमा किरण यांना अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. प्रेमा किरण यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अर्धांगी, धूमधडाका, दे दणादण, गडबड घोटाळा, सौभाग्यवती सरपंच, माहेरचा आहेर अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका केल्या होत्या.

Prema Kiran
श्रद्धा श्रीनाथ स्टारर 'Witness' चा फर्स्ट लूक रिलीज

दरम्यान, प्रेमा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. नव्या कलाकारांना मालिकांचे पैसे तीन महिन्यांपर्यंत मिळत नाहीत. तसंच पडद्यामागील कलाकारांनाही कोणी वाली नाही. त्यांच्यासाठी राजकीय पक्षाच्या माध्यमातून काम करण्याचं ठरविल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यावेळी त्यांनी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं सांगितलं होतं. प्रेमा किरण मराठी अभिनेत्री असण्यासोबतच निर्माती देखील आहे. मराठी चित्रपटसृष्टीशिवाय त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केले आहे.

प्रेमा किरण यांचे लक्षात राहणारे चित्रपट

धूम धडका (1985)

मॅडनेस (2001)

अर्जुन देवा (2001)

कुंकू झाले वैरी (2005)

लग्नाची वरात लंडनच्या घरात (2009 )

याबरोबर 'उतावळा नवरा' आणि 'थरकाप' तसेच दे दणादण, धूमधडका मधील ही त्यांच्या भूमिका गाजल्या त्यांची या चित्रपटातील गाणी आजही तितकीच प्रसिद्ध आहेत. तसेच प्रेमा किरण यांनी केवळ मराठीच नाही तर गुजराती, भोजपुरी, अवधी आणि बंजारा भाषांमधील चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. अभिनयासोबतच त्यांनी 1989 मध्ये आलेला 'उतावळा नवरा' आणि 'थरकाप' या चित्रपटांचीही निर्मिती केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.