जेष्ठ संगीतकार वनराज भाटिया यांचे निधन: अनेक प्रसिद्ध चित्रपटांना दिले संगीत 

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 7 मे 2021

बॉलीवूडचे जेष्ठ संगीतकार वनराज भाटिया यांचे आज सकाळी मुंबईत निधन झाले. ते 93 वर्षाचे होते.

बॉलीवूडचे (Bollywood) जेष्ठ संगीतकार (musician) वनराज भाटिया यांचे आज सकाळी मुंबईत निधन झाले. ते 93 वर्षाचे होते. त्यांनी मुंबई निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. बरेच दिवसापासून अनेक आजारांमुळे त्यांची तब्येत बरी नव्हती.वनराज भाटिया यांनी "जाने भी दो यारो", "तरंग", " अजूबा ", "बेटा" दामिनी, " घातक", "परदेस", अशा अनेक चित्रपटासाठी (film) संगीत दिले होते. 'भारत एक खोज' आणि 'तमस' या टीव्हीशोसाठी (TV show) त्यांनी संगीत दिले. (Senior musician Vanraj Bhatia passes away)

आता लोक थेट सोनू सूदच्या घरी पोहोचले...पहा व्हिडीओ
        
वनराज भाटिया यांनी लिरिल आणि ड्युअलक्ससारख्या ब्रँड्ससोबत सात हजार जाहिरातींच्या  जिगल्स बनवल्या आहेत. वनराज यांना पाश्चात्य तसेच हिंदुस्थानी संगीताची सखोल माहिती होती.1998 मध्ये 'तमस' चित्रपटासाठी वनराज भाटियांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. तसेच 2012 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. शम्मी कापुरच्या ' दिल देके देखो' या चित्रपटापासून त्यांनी संगीत क्षेत्राच्या प्रवासाला सुरुवात केली होती. 2000 मध्ये आलेल्या ' सरदारी बेगम' आणि ' हरि भरी' हे त्यांचे शेवटचे चित्रपट होते.

प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगच्या आईला A नेगेटिव्ह ब्लडची गरज

वनराज भाटिया यांचा जन्म ३१ मे १९२७ रोजी मुंबई येथे झाला. लंडनमधील रॉयल अ‍ॅकॅडमी ऑफ म्युझिकमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. १९५९ मध्ये ते भारतात परतले. श्याम बेनेगल यांच्या अंकुर या चित्रपटासाठी त्यांनी प्रथम पार्श्वसंगीत दिले वनराज भाटिया यांच्या निधनाने मनोरंजन उद्योगात शोकाची लाट आली आहे.  अनेकांनी त्यांना सोशल मीडियावरुन श्रध्दांजली वाहिली आहे

 

संबंधित बातम्या