नेहमी प्रमाणे सर्वजण मिळून जिंकू; शाहरुखच्या चाहत्यांना शुभेच्छा

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 14 मे 2021

शाहरुखने आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावरून ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

देशात आज ईद (Eid) साजरी करण्यात आली असून, कोरोना संसर्गाच्या संकटामुळे यावर्षी ईद घरातच साजरी करावी लागली असल्याचे  पाहायला मिळते आहे. याच पार्श्वभूमीवर सिनेसृष्टीतील वेगवगेळ्या कलाकारांनी (Celebrity) सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत.  प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचे (Shahrukh Khan) चाहते त्याच्या घरासमोर गर्दी करत असतात, तर शाहरुख देखील त्याच्या चाहत्यांना भेटत असतो. मात्र यावेळी कोरोना नियमांमुळे हे शक्य होऊ शकले नाही. शाहरुखने आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत. 

Viral: परेश रावल जिंदा है! सोशल मीडियावर हा हॅशटॅग का होतोय ट्रेंड?

शाहरुख खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी शाहरुख खानने आपला एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी षहरुख खानने 'सर्वांना ईदच्या शुभेच्छा...अल्लाह सर्वाना चांगले स्वास्थ्य देवो, शक्ती देवो, जेणेकरून आपण त्यांची मदत करू शकू ज्यांना नेहमी आपल्या मदतीची गरज असते' अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा आपण सर्वजण मिळून जिंकू... असेही शाहरुख पुढे म्हटला आहे. 

दरम्यान, झिरो या चित्रपटानंतर शाहरुख खानचा कुठलाच चित्रपट पाहायला मिळाला नाही. यानंतर शाहरुख खान लवकरच पठाण या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटात शाहरुख आणि दीपिकाची जोडी  दिसणार आहे. तसेच या चित्रपटात जॉन अब्राहम सुद्धा दिसून येणार आहे. शाहरुख या चित्रपटात एजंटची भूमिका करताना दिसणार असल्याचेही सांगितले जाते आहे. 
 

संबंधित बातम्या