
Pathaan Box Office: बॉलीवुडचा बादशाह शाहरुख खान याच्या पुनरागमनाचा चित्रपट म्हणून मोठी हाईप झालेल्या 'पठान' चित्रपटाने रीलीजनंतर बॉक्स ऑफिसवर कमाईची त्सुनामी आणली आहे. चित्रपटाने अवघ्या दोन दिवसात 129 कोटींहून अधिक रूपयांचा गल्ला कमावला आहे. अशी कमाई करणारा हा पहिलाच चित्रपट आहे.
केवळ देशातच नाही तर जगभरातून चित्रपटाला मोठा प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे दररोज कमाईचा एक नवा विक्रम हा चित्रपट नोंदवत चालला आहे. आताही या चित्रपटाने एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम नोंदवला आहे.
'पठान' ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर तब्बल 70 कोटींची कमाई केली आहे. त्यात या चित्रपटाच्या प्रादेशिक भाषेतील व्हर्जन्सची कमाई जोडली आणि ओव्हरसीज म्हणजे जगभरातील चित्रपटाची कमाई जोडली तर ती 220 कोटींच्या पुढे जाते.
पठानने रीलीजच्या पहिल्या दिवशी 57 कोटी रूपये कमावले होते. हे देखील एक रेकॉर्ड आहे. तर दुसऱ्या दिवशी प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा मोठा फायदा चित्रपटाला झाला. या दिवशी चित्रपटाने 70 कोटींची कमाई केल्याचे सांगितले जात आहे. अधिकृत आकडेवारीनुसार चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरातून 106 कोटींची कमाई केली होती.
शाहरूखचे ट्विट
दरम्यान, शाहरूख खाननेही एक ट्विट करून हे यश सेलिब्रेशन केले आहे. शाहरूखने ट्विटमध्ये म्हटले आहे की, मला वाटते आयुष्य हे असेच असते. तुम्ही तुमचे कमबॅक प्लॅन करायला बनलेले नसता. तुम्ही पुढे जायलाच बनलेले असता. त्यामुळे पाठेमागे फिरू नका. जे सुरू केले आहे ते शेवटपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. 57 वर्षीय व्यक्तीचा हा सल्ला आहे.
या चित्रपटांना टाकले मागे
कमाईच्या बाबतीत पठानने दुसऱ्या दिवशीही केजीएफ 2 ला मात दिली. केजीएफ 2 हिंदी व्हर्जनने दुसऱ्या दिवशी 46.79 कोटी कमावले होते. तर बाहुबली 2 ने दुसऱ्या दिवशी 40.5 कोटी कमावले होते.
कंगनाचा सल्ला
दरम्यान, बॉलीवुडची पंगा क्वीन कंगना राणावत हीने ट्विटमधून पठान चित्रपटाचे नाव बदलून इंडियन पठान असे ठेवावे, असा अनाहूत सल्ला दिला होता. भारतीय मुस्लीम देशभक्त आहेत. अफगाणिस्तानमधील मुस्लीमांपासून वेगळे आहेत. भारत कधी अफगाणिस्तान होऊ शकत नाही. तेथील परिस्थिती नरकाहून वाईट आहे. त्यामुळे कथेनुसार चित्रपटाचे खरे नाव इंडियन पठान असे हवे होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.