किंग खान ने विकत घेतला महिला क्रिकेट संघ!

कोलकता नाइट रायडर्स फ्रँचायझीमध्ये पहिल्या महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे.
Shah Rukh Khan
Shah Rukh KhanDainik Gomantak

बॉलिवूडचा किंग खान जो लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. कोलकता नाइट रायडर्स (KKR) फ्रँचायझीमध्ये पहिल्या महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. नाईट रायडर्सचा मालक SRK आहे आणि अलीकडेच त्याने त्रिनबागो नाइट रायडर्सचा महिला संघाची घोषणा केली आहे. या संदर्भात शाहरुख खानने ट्विट करत सांगितले आहे. (Shah Rukh Khan buys women cricket team)

Shah Rukh Khan
Video: 64 वर्षांचे ट्रकचालक आजोबा लूंगी नेसून खेळतायेत फ्री स्टाईल फुटबॉल

महिला कॅरिबियन प्रीमियर लीग (WCPL) च्या उद्घाटन सामन्यामध्ये लोक TKR चे प्रदर्शन बघू शकणार आहेत. ट्विटरवर SRK ने त्याच्या चाहत्यांना TKR बद्दल माहिती दिली आहे. अभिनेत्याने लिहिले की, “KKRiders, ADKRiders आणि अर्थातच TKRiders मधील सर्वं लोकांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. आशा आहे की हे लाईव्ह पाहण्यासाठी मी तिथे पोहोचू शकेन!!”

ट्विटर पोस्टमध्ये, TKR महिला संघ लाल जर्सीमध्ये दिसून येऊ शकतो असे सांगण्यात आले आहे. 30 ऑगस्ट रोजी टुर्नामेंटमध्ये प्रवेश करणारा संघ खूप आनंदात दिसून येत आहे. पुढे शाहरूख खान म्हणतो की, 18 ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या सामन्यात त्याचा संघ लाईव्ह खेळणार आहे.

शाहरुख केवळ कोलकाता नाईट रायडर्सचा मालक नाही, तर लॉस एंजेलिस नाइट रायडर्स आणि अबू धाबी नाइट रायडर्सची फ्रँचायझी देखील आहे. SRK च्या TKR व्यतिरिक्त, बार्बाडोस रॉयल्स आणि गयाना ऍमेझॉन वॉरियर्ससह इतर दोन संघांनी देखील लीगमध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे. डब्ल्यूसीपीएल पुरुषांच्या सीपीएलसह एकाच वेळी आयोजित केले जाणार आहे.

Shah Rukh Khan
परवापर्यंत खलनायक ठरलेला खेळाडू भारतीय टीमसाठी बनला सुपरमॅन; आफ्रिकन संघ गारद

किंग खान जुही चावलासोबत कोलकाता नाईट रायडर्सचा सह-मालक आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या आयपीएल लिलावात शाहरूख उपस्थित नव्हता. त्याच्या ऐवजी, त्याची मुलगी सुहाना खान मुलगा आर्यन खान आणि जुहीची मुलगी जान्हवी मेहता यांनी या कार्यक्रमामध्ये कलाकारांचे प्रतिनिधित्व केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com