किंग खान अमेरिकेत बांधणार 'स्टेडियम'

शाहरुख खानने अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये क्रिकेट स्टेडियम बांधण्याची तयारी करत असल्याचे जाहीर करत चाहत्यांना माहिती दिली आहे.
किंग खान अमेरिकेत बांधणार 'स्टेडियम'
Shahrukh KhanDainik Gomantak

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानला (Shahrukh Khan) क्रिकेटची किती आवड आहे हे सर्व चाहत्यांनाच माहीत आहे. तो इंडियन प्रीमियर लीग (IPL) संघ KKR चा मालक आहे आणि बरेच वेळा सामने पाहण्यासाठी स्वतः स्टेडियममध्ये शाहरूख पोहोचतो. आता शाहरुख खानने अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये क्रिकेट स्टेडियम बांधण्याची तयारी करत असल्याचे जाहीर करत चाहत्यांना माहिती दिली आहे. त्यांचा क्रिकेट संघ आणि USA MLC 20 यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दर्जाचे स्टेडियम बांधले जाणार आहे. 15 एकर जागेवर हे स्टेडियम बांधण्यात येणार असल्याचे शाहरुखच्या ट्विट मध्ये म्हटले गेले आहे. शाहरुख खानच्या वतीने शुक्रवारी निवेदन जारी करून ही माहिती देण्यात आली आहे. (Shah Rukh Khan to build stadium in US)

Shahrukh Khan
जस्मिन भसीन करतेय गुपचूप लग्न ? चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण

10 हजार लोकांसाठी बसण्याची स्टेडियममध्ये व्यवस्था

शाहरुख खान म्हणाला, “लॉस एंजेलिसमध्ये जागतिक दर्जाचे क्रिकेट स्टेडियम बांधण्याची योजना आमच्यासाठी आणि एमएलसीसाठी खूप रोमांचक असणार आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठित ठिकाणांपैकी एक असलेल्या या जागेवरील इमारतीचा क्रिकेटच्या परिवर्तनावर खोलवर परिणाम होईल यात काही शंका नाही. "MLC मधील आमची गुंतवणूक अमेरिकेतील क्रिकेटच्या भवितव्यासाठी रोमांचक ठरणार आहे," असे निवेदनात म्हटले गेले आहे. रिपोर्टनुसार, स्टेडियममध्ये 10 हजार लोकांसाठी बसण्याची व्यवस्था देखील केली जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.