Shahrukh Khan : शाहरुखने गर्लफ्रेंडच्या नादात खाल्ला होता मार... नेमकं काय घडलं होतं?

बॉलिवूडच्या बादशाहने एकदा दिल्लीच्या रस्त्यावर मार खाल्ला होता
Shah Rukh Khan
Shah Rukh KhanDainik Gomantak

अभिनेता शाहरुख खानने कधी कुणाचा मार खाल्ला आहे असं आपल्याला कुणी सांगितलं तर पटेल का? कारण पडद्यावर व्हिलन्सची धुलाई करणारा शाहरूख पण असं एकदा घडलं होतं आणि हे स्वत: शाहरुख खाननेच सांगितलं आहे.

आपण एकदाच जगतो, एकदाच मरतो, एकदाच लग्न करतो आणि एकदाच प्रेमात पडतो... हा डायलॉग शाहरुख खानच्या 'कुछ कुछ होता है' या चित्रपटातील आहे.  काहींना आठवतही असेल. किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्याच्या आयुष्यावरही हा डायलॉग अगदी चपखल बसतो.

ज्या मुलीसाठी शाहरुखने मार खाल्ला ती गौरी होती? नक्कीच नाही. आता तुम्ही म्हणाल की मग कोण? कारण शाहरुख तर गौरीशिवाय दुसरं कुणाचा विचारही करेल हे खरं वाटणार नाही.  त्याने गौरी खानवरच प्रेम केले आणि लग्न केले दोघे त्यांच्या आयुष्यात खुश आहेत.

शाहरुखला कपिल शर्माने एका कार्यक्रमात एक प्रश्न विचारला आणि मग किंग खानने हा अशक्य वाटणारा किस्सा सांगितला. घडलेल्या या घटनेनंतर शाहरुखला मारहाणही झाली होती. त्यानंतर तो गौरीला वहिनी म्हणू लागला.

आज करोडो मुली शाहरुख खानवर लट्टू आहेत . त्याच्यावर खूप प्रेम करतात. पण जिला शाहरुखने मनापासुन प्रेम दिले, ती किती भाग्यवान आहे, अर्थातच ती गौरी आहे. पण हा किस्सा गौरीचा नाही..

 एका अवॉर्ड शोमध्ये कपिल शर्माने स्टेजवर 'पठाण'ला विचारले होते की, त्याने कधी कोणत्याही मुलीची छेड काढली आहे का? तुम्ही कधी मुलीसोबत डेटवर गेला आहात का? यावर शाहरुखने दिलेले उत्तर ऐकून तुम्हीही हसाल आणि थक्क व्हाल.

सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये कपिल शाहरुख खानला विचारतो – तुम्ही दिल्लीत राहायचा, तुम्ही कधी मुलींची छेड काढायली का? यावर शाहरुख म्हणतो – हो, हा आमचा हक्क आहे. दिल्लीकरांना जन्मताच अधिकार आहे. 

पण माझ्यासोबत एक-दोन गोष्टी अशा घडल्या की त्यानंतर मी ते कमी केले. मी ग्रीन पार्क मध्ये होतो. मी नवीन मैत्रीण केली होती. मैत्रीण काय होती दिल्लीचे लोक गर्लफ्रेंड म्हणतात म्हणून. तसंच. ती गर्लफ्रेंड नव्हती, फक्त एक मुलगी होती तिच्यासोबत माझी मैत्री झाली होती.

Shah Rukh Khan
Kangana Ranaut on Khalistani Movement :"पंजाबमधली दहशत पाहुन लाज वाटते ?" कंगना रणौतने कुणाला केला हा सवाल?

शाहरुख पुढे म्हणाला, 'म्हणून मी जात होतो, इथे दिल्लीत काही गुंड प्रकारची मुले आहेत. एकाने मला थांबवले. मी इंग्लिश मीडियमच्या शाळेतून थोडा होतो, म्हणून मी इंग्रजीत स्टाइलने सांगितले की ती माझी गर्लफ्रेंड आहे . तर तो म्हणाला की तुझी गर्लफ्रेंड नाही तुझी वहिनी आहे. मी म्हणालो वहिनी नाही. ही माझी गर्लफ्रेंड आहे. 

तो म्हणाला नाही, ती वहिनी आहे. यानंतर जेव्हा मी म्हणालो की ती माझी गर्लफ्रेंड आहे दोघांनी मला बेदम मारहाण केली. यानंतर आता अशी वेळ आली आहे की मी माझ्या पत्नीसोबत दिल्लीत बाहेर जातो आणि कोणी विचारले की ती कोण आहे, तर मी म्हणते की ती माझी वहिनी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com