Pathan Controvesry : पठाणच्या वादावर चित्रपट वितरक मनोज देसाई म्हणाले हा चित्रपट हिंदु-मुस्लीम सगळेच...

शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटावर चित्रपट वितरक मनोज देसाई यांनी मत व्यक्त केलं आहे.
Pathan 
Shah Rukh Khan
Pathan Shah Rukh Khan Dainik Gomantak

शाहरुख खानचा आगामी पठाण चित्रपट खुप काळापासुन वादात अडकला आहे. आता या चित्रपटाला सेन्सॉरने हिरवा कंदिल दाखवला आहे ;पण तरीही चित्रपटाला होणारा विरोध काही केल्या थांबत नाही. यावर आता ज्येष्ठ चित्रपट वितरक मनोज देसाई यांनी संताप व्यक्त केला आहे. बॉयकॉट करणाऱ्या लोकांचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

'पठाण' चित्रपटाच्या बेशरम रंग गाण्यावरुन देशभरात अभुतपूर्व गोंधळ झाला होता. "शाहरुख खानची चामडी सोलुन त्याला जिवंत जाळु" असं म्हणण्यापर्यंत अयोध्येच्या एका संताची मजल गेली होती.

'पठाण' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि त्याला जगभरातील चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. चित्रपटाच्या ट्रेलरनंतर काही लोकांच्य मनातले विचार बदलले. वास्तविक ट्रेलरमध्ये वादग्रस्त असे काहीही दिसले नाही.

दीपिका पदुकोणच्या भगव्या बिकिनीमुळे धार्मिक गटांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि भगव्या बिकिनीचा सिन काढून टाकेपर्यंत चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले. 

काही हिंदुत्ववादी संघटनांनी 'बेशरम रंग' या गाण्याचा निषेध केला . काही संघटनांनी नाराजी व्यक्त करत 'भगव्या रंगाचा अपमान खपवून घेतला जाणार नाही' असे म्हटलं आहे. 

सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदाल यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली की हे गाणे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत आहे. या वादाची तीव्रता एवढी वाढली की बिहारमध्ये शाहरुख खानसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यावर आता चित्रपट वितरक मनोज देसाई यांनी मोठे विधान केले आहे .

Pathan 
Shah Rukh Khan
Pongal Weekend And South Cinema: पोंगलच्या सुट्ट्यांमध्ये या दोन साऊथ सुपरस्टारचे तगडे चित्रपट येणार...

ज्येष्ठ चित्रपट वितरक आणि वांद्रे येथील G7 मल्टिप्लेक्सचे मालक मनोज देसाई म्हणाले की हिंदू आणि मुस्लिम शाहरुख खानचा चित्रपट समान संख्येने आणि एकत्र पाहतील.

#BoycottPathan हा काही ट्रेंड नाही तो तर एक प्रचार आहे असंही देसाई यांनी म्हटले आहे. 25 जानेवारीला रिलीज होणारा हा चित्रपट प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरतोय हे नक्की.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com