Farzi Movie Trailer: शाहिद कपूरच्‍या ‘फर्जी’चा Original Trailer आला, पाहा ट्रेलर

अभिनेता शाहिद कपूर आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतूपती याच्‍या ‘फर्जी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.
Farzi Movie
Farzi MovieDainik Gomantak

अभिनेता शाहिद कपूर आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती याच्‍या ‘फर्जी’ या वेब सिरिजचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. अलिकडेच ‘फर्जी’चा एक नकली व्हिडिओ समोर आला होता, त्यात शाहिदने चित्रपटाचा ओरिजनल ट्रेलर आज म्हणजेच 13 जानेवारीला येणार असल्याचे सांगितले होते.

त्यानुसार सिरिजचा ओरिजनल ट्रेलर आला असून यात शाहिद धमाकेदार Action करताना दिसत आहे. शिवाय विजय सेतुपती यांचे देखील धम्माल भूमिका असल्याचे दिसत आहे.

Farzi Movie
Miss Universe 2023: दिविता राय करणार भारताचे प्रतिनिधीत्व, जाणून घ्या

ट्रेलरमध्ये वेब सीरिजची धमाकेदार झलक पाहायला मिळाली आहे. या मालिकेत शाहिद एका गुंडाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर विजय एक अधिकारी असून, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

'फर्जी'मध्ये के के मेनन, राशि खन्ना, अमोल पालेकर, रेजिना कॅसॅंड्रा आणि भुवन अरोरा यांच्याही भूमिका आहेत. हा क्राईम थ्रिलर 10 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर आणि विजय सेतुपती आणि कृष्णा डीके 'फर्जी'मधून पहिल्यांदाच डिजिटल पदार्पण केले आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

येथे पाहा ट्रेलर

Farzi Movie
Miss Universe 2023 : मिस युनिव्हर्ससाठी यंदा भारताकडून जाणारी दिविता राय नेमकी कोण आहे?

'फर्जी' मध्ये शाहिद आणि विजय सेतुपती एकमेकांचा पाठलाग करताना दिसत आहेत. ट्रेलरच्या सुरुवातीला शाहिदवर नोटांचा वर्षाव होताना दिसत आहेत. मला इतके पैसे कमवायचे आहेत की मला त्याचा आदर करण्याची गरज वाटणार नाही.

असा एक शाहिदचा डायललॉग ऐकू येतो. त्यानंतर, शाहिद आणि त्याची टीम 'बनावट नोटा' बनवतात आणि रातोरात कसे श्रीमंत होतात याची झलक ट्रेलरमध्ये दाखविण्यात आली आहे.

"हम मध्यम वर्ग नहीं हैं, हम लोग मध्यमवर्गीय हैं." असा एक डायलॉग या ट्रेलरमध्ये ऐकू येतो. दरम्यान, ही वेब सिरीज धमाल करणार आहे असे दिसत आहे.

ट्रेलरमध्ये शाहिद कपूर पैशाला महत्त्व देताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये शाहिद कपूरची एन्ट्री खूपच दमदार दाखवण्यात आली आहे. त्याचबरोबर सेतुपती पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे. फर्जी हा शाहिदचा मोस्ट अवेटेड चित्रपट आहे. या लोक खूप दिवसांपासून वाट पाहत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com