Shahrukh Kajol: शाहरुख आणि काजोल 7 वर्षानंतर पुन्हा दिसणार 'या' चित्रपटात एकत्र!

शाहरुख खान आणि काजलो ही प्रेक्षकांची नेहमीच आवडती जोडी राहिली आहे.
Shahrukh Kajol: शाहरुख आणि काजोल 7 वर्षानंतर पुन्हा दिसणार 'या' चित्रपटात एकत्र!
Shahrukh KajolDainik Gomantak

बॉलिवूडचा किंग खान 'शाहरुख खान' आणि काजोल यांची जोडी नेहमीच हिट जोडी राहिली आहे. त्यांची जोडी चाहत्यांमध्ये ऑल टाइम फेव्हरेट आहे. आजही त्यांची जोडी प्रेक्षकांना मनातून उतरलेली नाही. त्यामुळेच शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) आगामी चित्रपटांकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सुपरस्टार शाहरुख खानबाबत एक रंजक माहिती समोर येत आहे. (Shahrukh Kajol latest news)

मीडिया रिपोर्टनुसार काजोल आणि शाहरुख खान पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दिग्दर्शक करण जोहर यांच्या 'रॉकी की राणी की प्रेम कहाणीमध्ये शाहरुख खान आणि काजोलला एकत्र आणणार आहे. या चित्रपटात शाहरुख (Shahrukh Khan) आणि काजोलच्या छोट्या भूमिका आहेत. या चित्रपटात आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहेत. तर जया बच्चन, शबाना आझमी आणि धर्मेंद्र हे देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. काजोल आणि शाहरुख या चित्रपटात (Movie) कॅमिओ करताना दिसणार असल्याचे बोलले जात आहे. दोघेही लवकरच चित्रपटातील त्यांच्या भागाचे शूटिंग करणार आहेत. हे शूट मुंबईतच (Mumbai) होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Shahrukh Kajol
Unaad Movie: 62 व्या झ्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘उनाड’ ची निवड

* शाहरुख आणि काजोल दोघेही 7 वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार

खर तर या चर्चेला शाहरुख आणि काजोलने दुजोरा दिलेला नाही. पण जर ही बातमी खरी ठरली, तर सात वर्षांनंतर हे दोन्ही कलाकार पुन्हा एकत्र दिसणार आहेत. याआधी 2015 मध्ये रोहित शेट्टीच्या 'दिलवाले' या चित्रपटात दोघेही शेवटचे दिसले होते. सध्या काजोल लवकरच दिग्दर्शिका रेवतीच्या आगामी 'द लास्ट हुर्रा' या चित्रपटात दिसणार आहे. शाहरुख सध्या त्याच्या 'पठाण' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. याशिवाय तो राजकुमार हिरानी यांच्या 'डंकी' या चित्रपटात दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.