शाहरुख खानच्या 'मन्नत' मधील एक खोली भाड्याने घेण्यासाठी मोजावी लागेल तीस वर्षाची मेहनत!

Shahrukh Khan Mannat Bungalow: मन्नतमध्ये करोडो रुपयांची खोली भाड्याने घ्यायची असेल तर किती किंमत मोजावी लागेल याचा खुलासा खुद्द किंग खानने केला आहे
Shah Rukh Khan| mannat| bollywood
Shah Rukh Khan| mannat| bollywoodDainik Gomantak

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुखचा बंगला 'मन्नत' अतिशय आलिशान आणि सुंदर आहे. ज्यामध्ये राहणे एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नसणार. याच कारणामुळे मुंबईत येणारे बहुतेक लोक किंग खानच्या घरासमोर उभे राहून फोटो नक्की क्लिक करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे की या बंगल्यातील खोलीचे भाडे किती असेल. (Shahrukh Khan Mannat Bungalow News)

सगळ्यांना माहित आहे की, शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) घराचा जगातील सर्वात आलिशान घरांच्या यादीत समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, या घराची किंमत सुमारे 200 कोटी रुपये आहे. अशा परिस्थितीत बंगल्याची खोली किती रूपये भाड्याने मिळेल याची माहिती खुद्द शाहरुख खानने दिली आहे.

शाहरुख खानने एकदा त्याच्या चाहत्यांसाठी एसआरकेचे एक सत्र आयोजित केले होते. ज्यामध्ये अनेक चाहत्यांनी त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाशी संबंधित गोष्टींवर प्रश्न विचारले होते. यादरम्यान एका चाहत्याने त्यांना मन्नत या बंगल्याच्या खोलीच्या भाड्याबाबत विचारले. तेव्हा किंग खानने ट्विट (Twit) करत लिहिले की, 'यासाठी 30 वर्षांची मेहनत मोजावी लागेल'. शाहरूख खानने किंमत सांगितली नसली तरी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांच्या एका ओळीत दडले होते.

* भाडेतत्त्वावर घेतलेला मन्नत शाहरुख खानचा
हा बंगला केवळ घरच नाही तर लोकांसाठी एक पर्यटन (Tourist) स्थळ आहे. ज्याला पाहण्यासाठी लोक लांबून येतात. रिपोर्ट्सनुसार, किंग खानने हा बंगला 2001 मध्ये 13.32 च्या सुमारास लीजवर घेतला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com