दिवसात 100 सिगारेट आणि 30 कप कॉफी, शाहरुख खानने सांगितल्या त्याच्या सवयी

Shahrukh Khan Addiction : शाहरुख खानला धूम्रपानाचे व्यसन आहे आणि त्याने हे उघडपणे जाहीर केले आहे.
दिवसात 100 सिगारेट आणि 30 कप कॉफी, शाहरुख खानने सांगितल्या त्याच्या सवयी
Shahrukh Khan AddictionDainik Gomantak | DON 3 Movie News

बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याला बॉलिवूडमध्ये ते स्थान मिळाले आहे, जे प्रत्येकाला जमत नाही. पण या प्रसिद्धीमागेही असे सत्य दडले आहे, जे जाणून तुम्हालाही धक्का बसेल. करोडो हृदयांवर राज्य करणारा शाहरुख खान अशी जीवनशैली जगतो, ज्याबद्दल जाणून आपण आश्चर्यचकित होऊ शकतो.

Shahrukh Khan Addiction
मोरजी बीचवर मोनालीसाचा हॉट फोटोशूट

शाहरुख खानला धूम्रपानाचे व्यसन आहे आणि त्याने हे उघडपणे जाहीर केले आहे. 2011 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत, त्याने स्वत: त्याची ही सवय सांगितली आणि खुलासा केला की तो दिवसाला 100 सिगारेट ओढतो आणि सुमारे 30 कप ब्लॅक कॉफी पितो. त्याच मुलाखतीत शाहरुखने त्याच्या खाण्यावरच्या प्रेमाविषयीही सांगितले. तो म्हणाला की त्याच्या वडिलांचे दिल्लीत रेस्टॉरंट होते आणि त्याची आई अप्रतिम हैदराबादी जेवण बनवते. त्याने असेही सांगितले की त्याची आई त्याला स्वतःच्या हाताने खाऊ घालायची.

याच मुलाखतीत शाहरुख खाननेही आपल्या आहाराबद्दल खुलासा केला होता. त्याने सांगितले की मला झोप येत नाही. मी सुमारे 100 सिगारेट ओढतो. मी जेवायला विसरतो. मला शूटिंगच्या मधल्या काळात आठवत की मलाही जेवायला हवं. मी पाणी पीत नाही. मी एकंदर तीस कप ब्लॅक कॉफी पितो आणि माझ्याकडे सिक्स पॅक ऍब्स आहेत. त्यामुळे मी स्वत:ची जितकी कमी काळजी घेतो तितकी माझी आपोआप काळजी घेतली जाते.

अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, शाहरुख खान शेवटचा 'झिरो' चित्रपटात दिसला होता, या चित्रपटात अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफसोबत होता. हा चित्रपट आनंद एल राय यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट लोकांना अजिबात आवडला नाही. या चित्रपटानंतर शाहरुखने दीर्घ ब्रेक घेतला. आता शाहरुख लवकरच सिद्धार्थ आनंदच्या 'पठाण' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका आणि जॉन अब्राहम दिसणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.