
Shahrukh khan's Jawan online Leak : अभिनेता शाहरुख खानचा जवान 7 सप्टेंबरला जगभरात रिलीज झाला आणि 'पठान'नंतर आतुरतेने वाट पाहणाऱ्या त्याच्या चाहत्यांनी उत्सवच साजरा केला.
ही गोष्ट पठानच्या वेळीही सिद्ध झालीय की शाहरुखच्या चाहत्यांसाठी त्याचा चित्रपट एखाद्या उत्सवापेक्षा कमी नसतो.
गेले काही दिवस मनोरंजन विश्वात शाहरुख खान आणि विजय सेतूपती यांची भूमीका असणारा जवान चर्चेचा विषय बनला आहे.
चित्रपटात साऊथची ब्युटी क्वीन नयनतारा, दिपीका पदूकोन यांच्याही भूमीका आहेत.
जवानकडून निर्माते आणि स्टार्सना खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.
मात्र याचदरम्यान 'जवान' चित्रपटाबाबत एक वाईट बातमी समोर आली आहे. वास्तविक, शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला आहे.
amilRockers , MP4Movies, Pagalworld, VegaMovies आणि Filmyzilla या साईटवर चित्रपट रिलीज झाल्याने मोठी खळबळ उडाली
आता या चित्रपटाच्या लीकचा बॉक्स ऑफिसवर कितपत परिणाम होतो हे पाहायचे आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान , नयनतारा आणि विजय सेतुपती यांचा चित्रपट ' जवान ' रिलीजच्या पहिल्याच दिवशी ऑनलाइन लीक झाला आहे.
'जवान' हा चित्रपट TamilRockers , MP4Movies, Pagalworld, VegaMovies आणि Filmyzilla यासह अनेक साइटवर ऑनलाइन लीक झाला आहे .
चित्रपट लीक झाल्यानंतर निर्मात्यांना यामुळे करोडो रुपयांचे नुकसान होऊ शकते असे मानले जात आहे. चित्रपटांच्या पायरसीचा विषय अनेकदा इंडस्ट्रीत कळीचा मुद्दा बनला आहे.
याआधीही शाहरुखचा चित्रपट लीक झाला आहे. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा 'पठाण' देखील ऑनलाईन लीकचा बळी ठरला आहे.
पठानच्या लीकच्या चित्रपटाच्या कमाईवर फारसा परिणाम झाला नाही. शाहरुख खानचा 'जवान' पहिल्याच दिवशी कमाई करेल, सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरणार असा अंदाज बांधण्यात येत आहे.
'जवान' चित्रपट लीक झाल्याच्या बातमीने निर्मात्यांना धक्का बसलेला असतानाच, दुसरीकडे चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगच्या आकड्यांमुळे निर्मात्यांना खूप आनंद झाला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या 'जवान' चित्रपटाने आगाऊ बुकिंगमध्ये 50 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
चित्रपट व्यापार तज्ज्ञांनुसार शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपती यांची मुख्य भूमीका असणारा हा चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करेल.