Shah Rukh Khan: किंग खानच्या 'पठान'चा सीक्वेलही येणार

पटकथेवर काम सुरू; पुढील वर्षी 25 जानेवारी रोजी 'पठान' प्रदर्शित होणार
Shah Rukh Khan
Shah Rukh KhanDainik Gomantak

Shah Rukh Khan: बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खान आगामी 'पठान' या चित्रपटाची गेल्या काही काळापासून मोठी हाईप निर्माण झाली आहे. या चित्रपटांच्या नवनव्या अपडेटस दर काही दिवसांनी चाहत्यांसाठी खुल्या केल्या जात आहेत. ताज्या माहितीनुसार आता 'पठान'चा सीक्वेल देखील येणार असून त्याच्या पटकथेवरही काम सुरू झाले आहे.

Shah Rukh Khan
Shehnaaz Gill: शहनाज गिलच्या वडिलांना फोनवर जिवे मारण्याच्या धमक्या...

शाहरूखचा अखेरचा चित्रपट 'झीरो' 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. जो फ्लॉप ठरला होता. त्यानंतर पाच वर्षांनी 'पठान'मधून किंग खान मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 'पठान' पुढील वर्षी म्हणजेच 2023 च्या प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी (25 जानेवारी 2023) प्रदर्शित होत आहे. शाहरूखच्या चाहत्यांना या चित्रपटाची मोठी उत्सुकता लागून राहिली आहे.

निर्मात्यांनी 'पठान' चा सीक्वेल करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी नव्या कॅरेक्टर्सवर विचार केला जात आहे. पटकथेवर काम सुरू झाले आहे. 'पठान' मध्ये एसआरकेसोबत दीपिका पदुकोन आणि जॉन अब्राहम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे ओटीटीचे हक्क नेटफ्लिक्सने आधीच घसघशीत रक्कम देऊन खरेदी केले आहेत.

Shah Rukh Khan
R Madhavan Trolled: रणवीर सिंगसह फोटो शेअर केल्याने आर माधवन झाला ट्रोल

या चित्रपटात शाहरूख एका भारतीय हेराच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील आहे. यात सलमान खान त्याच्या 'टायगर' या भूमिकेतील कॅमियो (छोटी भूमिका) करताना दिसेल. ज्या प्रमाणे हॉलीवूडमध्ये मार्व्हलच्या सुपरहीरोजचा मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स बनवला गेला, त्याच धरतीवर यशराज बॅनरचा हा स्पाय युनिव्हर्स असेल.

त्यात पुढे जाऊन यशराजच्या 'टायगर जिंदा है' मधील सलमान खान (टायगर) आणि 'वॉर'मधील हृतिक रोशन (कबीर) हे तिघेही एकाच चित्रपटात एकत्र येण्याची शक्यता आहे. सलमान खानच्या आगामी 'टायगर ३'मध्येही शाहरूखच्या 'पठान'मधील भूमिकेचा कॅमियो असणार आहे. यशराज बॅनरचा आगामी चित्रपट 'फायटर' देखील या स्पाय युनिव्हर्सचा भाग असेल अशी चर्चा आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोन यांच्या भूमिका आहेत.

दरम्यान, पठान शिवाय शाहरूख आगामी काळात अॅटली कुमार दिग्दर्शित 'जवान'मध्ये दिसणार आहे. यात साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत शाहरूखची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे, शिवाय यात थलपती विजय याचा कॅमियोही असणार आहे. तसेच राजकुमार हिराणी यांच्या 'डंकी'मध्येही शाहरूख दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com