शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांत कपूरला अंमली पदार्थ विरोधी प्रकरणात अटक

सिद्धांत कपूर याला अंमली पदार्थ विरोधी प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांत कपूरला अंमली पदार्थ विरोधी प्रकरणात अटक
Siddhant Kapoor Dainik Gomantak

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते शक्ती कपूर (Shakti Kapoor) यांचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) भाऊ सिद्धांत कपूर (Siddhant Kapoor) याला अमली पदार्थ विरोधी प्रकरणात अटक करण्यात आली. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर ड्रग्ज प्रकरणात चित्रपट जगताशी संबंधित लोकांची नावे समोर येताना दिसत आहेत. (Shakti Kapoor son Siddhant Kapoor has been arrested in an anti drug case)

सोमवारी सिद्धांत कपूरवर कारवाई करण्यात आली आहे तसेच ड्रग्ज घेतल्याचा आरोप झाल्यानंतर पोलिसांनी त्याला बंगळुरूमध्ये अटक केली आहे. 12 जूनच्या रात्री बेंगळुरूच्या एका हॉटेलमध्ये एका रेव्ह पार्टीत छापा मारताना कथितरित्या अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या 6 जणांमध्ये अभिनेता शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांत कपूरचा देखील समावेश आहे.

2020 मध्ये, श्रद्धा कपूरला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने फिल्मस्टार सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग प्रकरणातील तपासात तिची जबानी नोंदवण्यासाठी बोलावले होते. एनसीबीच्या तपास पथकाने राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरण आणि बॉलीवूड-ड्रग्सच्या संबंधासंदर्भात तिचे विधान नोंदवले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com