जुनी आठवण शेयर करत रवीना टंडन म्हणाली;  हे खूप आधीच मिळायला हवं होतं.. 

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 14 मे 2021

रवीनाचा पुढचा चित्रपट 'केजीएफ: अध्याय 2' आहे, ज्यामध्ये ती दक्षिण सुपरस्टार यश आणि संजय दत्त सोबत दिसणार आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव  असते आणि बऱ्याचदा तिच्या  लाईफस्टाइल संबंधित खास माहितीही आपल्या चाहत्यांमध्ये शेअर करत असते. अलीकडेच रवीना  टंडनने काही  थ्रोबॅक फोटो शेअर करुन बॉलीवडूचे दिवंगत अभिनेता ऋषि कपूर आणि नीतू कपूर यांचा थ्रोबॅक फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. ज्यामध्ये रवीना टंडन खूपच लहान असल्याचे दिसत आहे.  हा फोटो ऋषि कपूर  आणि नितू कपूर यांच्या लग्नातील  या फोटोत रवीना  कॅमेर्‍याकडे पाहून  हसताना  दिसत आहे. (Sharing old memories, Raveena Tandon said; It should have been received much earlier ...) 

Viral: परेश रावल जिंदा है! सोशल मीडियावर हा हॅशटॅग का होतोय ट्रेंड?

फोटो पोस्ट करताना रवीना टंडनने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, की मला एक सुंदर गोष्ट मिळाली आहे. खरंतर ती मिळण्यासाठी खूप उशीर झाला आहे, पण ही गोष्ट शोधून देणाऱ्या @ juuhithesoniibabbar थँक्यू. चिंटू चाचा (ऋषि कपूर) यांनी आपल्या आत्मचरित्रात  उल्लेख करण्यासाठी या फोटो बद्दल मला अनेकदा विचारले होते. परंतु त्यावेळी तो मला मिळाला नाही. आता मला एक भेट मिळाली आहे. चिंटू चाचाच्या लग्नात मी फ्रॉक घालून त्याच्या शेजारी उभी आहे. हा फोटो मालअ आधीच मिळाला असतं तर किती बर झालं असतं. तरीही हा माझ्यासाठी एक खजिनाच आहे. ' 

दरम्यान  रवीना टंडनआजकाल कोरोना रूग्णांना ऑक्सिजन सिलिंडर्स देण्यासाठी खूप चर्चेत आहे. अलीकडेच तिने  मुंबईहून दिल्लीला अनेक ऑक्सिजन ट्रक पाठवले आहेत. रवीनाचा पुढचा चित्रपट 'केजीएफ: अध्याय 2' आहे, ज्यामध्ये ती दक्षिण सुपरस्टार यश आणि संजय दत्त सोबत दिसणार आहे. 

संबंधित बातम्या