3-Idiotsच्या त्या सिन साठी आम्ही खरच ड्रिंक केली होती; शर्मन जोशीने सांगितला भन्नाट अनुभव

दैनिक गोमंतक
बुधवार, 2 जून 2021

आर माधवन, शर्मन जोशी आणि अमीर खान या तिन्ही अभिनेत्यांनी या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता आर माधवनने (R. Madhvan) काल एक जून रोजी आपला वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी अभिनेता शर्मन जोशीने (Sharman Joshi) 3-इडियट्स (3-Idiots) चित्रपटातील काही आठवणी सांगितल्या. आर माधवन, शर्मन जोशी आणि अमीर खान (Amir Khan) या तिन्ही अभिनेत्यांनी या चित्रपटात एकत्र काम केले आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या चित्रपटाची अजूनही चर्चा सुरु असते. असाच एक किस्सा शर्मन जोशीने सांगितला. (Sharman Joshi shared his experience of drinking in 3-Idiots)

2009 मध्ये प्रदर्शित झालेला 3-इडियट्स हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील एका प्रसंगात चित्रपटातील राजू, रॅन्चो आणि फरहान हे तीन पात्र एकत्र बसून मद्यप्राशन करत असल्याचे एका प्रसंगात पाहायला मिळाले आहे. याच दृश्याबद्दल बोलताना शर्मन जोशीने सांगितले की, या प्रसंगाच्या चित्रीकरणासाठी खरोखर मद्यप्राशन करावे लागेल असे अमीर खानला वाटत होते.

PHOTO: तारा सुतारिया गोव्याच्या आठवणीत

"मला तो प्रसंग अजूनही आठवतो, जिथे मी, अमीर आणि मॅडी तिघेही नशेत होतो आणि आणि बोमन इराणी यांनी साकारलेल्या पात्रावर राग व्यक्त करत होतो. तेव्हा अमीरने सुचवले की, या सीनसाठी आपल्याला खरोखर मद्यप्राशन करावं लागेल. तेव्हा अमीरने आणि मी मद्यप्राशन केले मात्र मॅडी तिथे उशिरा पोहोचला. तेव्हा आमिरने त्याला आमच्यासोबत बसायला सांगितले. मॅडी जास्त मद्यप्राशन करत नाही मात्र त्या प्रसंगात त्याने आम्हाला उत्तम प्रतिसाद दिला होता." असा अनुभव यावेळी शर्मनने शेअर केला.  

संबंधित बातम्या