शशांक केतकरच्या घरी लवकरच कुणी तरी येणार गं!

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020

होणार सून मी ह्या घरची या मालिकेत मुख्य भूमीका करणारा श्री म्हणजेच शशांक केतकरने ख्रिसमस निमित्त आपल्या चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे.

मुंबई: येत्या नव्या वर्षात अनेक सेलिब्रिटींच्या घरी नव्या पाहुण्यांचं आगमन होणार आहे. यात मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकरच सुध्दा नाव आता घ्यावं लागणार आहे.  होणार सून मी ह्या घरची या मालिकेत मुख्य भूमीका करणारा श्री म्हणजेच शशांक केतकरने ख्रिसमस निमित्त आपल्या चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. शशांक लवकरच बाबा होणार आहे त्याच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर  करत  ही माहिती दिली.

“सांताक्लॉज येतो आणि आपल्याला भेटवस्तू देतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण, सांताक्लॉजने दिलेल्या भेटवस्तूंपैकी एखादी भेटवस्तू इतकी सुंदर असू शकते याची मात्र आम्हाला कल्पना नव्हती. तुम्हा सगळ्यांना आमच्या तिघांकडून हॅपी हॉलिडे आणि नाताळच्या शुभेच्छा”, अशी पोस्ट करत शशांकने ही गोड बातमी दिली.

त्याच्या या पोस्टनंतर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून अनेकांनी त्यांना शुभेच्छां जिल्या आहे. शशांकने ही गुड न्यूज शेअर करूत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. 

संबंधित बातम्या