Shehnaaz Gill: चित्रपट भूमीचा चर्चा मात्र शहनाजची; 'थँक्यू फॉर कमिंग' चित्रपटातील पहिले गाणे रिलिज

Shehnaaz Gill: नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता.
Shehnaaz Gill
Shehnaaz GillDainik Gomantak

Shehnaaz Gill: बॉलीवूडमधील काही कलाकार त्यांच्या सहज अभिनयासाठी ओळखले जातात. भूमी पेडणेकर ही त्या मोजक्या कलाकरांपैकी एक आहे. आत्तापर्यंत अनेक चित्रपटातून भूमी पेडणेकरने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.

आता भूमी एका नवीन चित्रपटातून एका नवी गोष्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. थँक्यू फॉर कमिंग असे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. आता यातील हांजी हे गाणे रिलिज झाले असून गाण्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

सोशल मिडियावर चाहते या गाण्यावर विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काहींनी तर गाणे भूमीचे मात्र सगळे क्रेडिट शेहनाज गिल घेऊन गेली असे म्हटले आहे. या गाण्यात भूमी पेडणेकरपासून ते शहनाज गिल, कुशा कपिला, डॉली सिंग आणि शिबानी बेदीपर्यंत सर्वजण पार्टीच्या रंगात रंगताना दिसत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता.

हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे दिसून येत आले आहे. थँक यू फॉर कमिंग' मधील 'हांजी' हे गाणे एका क्लबमध्ये शूट केल्याचे दिसत आहे. या कल्बमध्ये भूमी आणि तिची टोळी दिसत आहे. या गाण्यात करण कुंद्रा देखील दिसत आहे. करण कल्बमधील मुलींना ड्रिंक्स देताना दिसत आहे.

Shehnaaz Gill
Pooja Bhatt: आलिया ही महेश भट्ट अन् पूजा यांची मुलगी? अभिनेत्री म्हणते...

चर्चा मात्र शेहनाजची

या चित्रपटात शहनाज गिलदेखील दिसून येत आहे. चित्रपटातील पहिले गाणे रिलिज झाल्यानंतर चाहते शहनाज गिलच्या पर्फॉर्मन्सवर खूष झाले आहेत. चाहत्यांनी तिचे भरभरुन कौतुक केले आहे. शहनाजसाठी आम्ही हा चित्रपट यशस्वी व्हावा अशा शुभेच्छा देतो असे काही युजर्संनी म्हटले आहे. तर काहींनी या गाण्यात शहनाजने लाइमलाइट आपल्याकडे घेतल्याचे म्हटले आहे.

दरम्यान 'थँक यू फॉर कमिंग' ही कनिका कपूर नावाच्या मुलीची कथा असून या भूमिकेत भूमी पेडणेकर दिसत आहे. कनिका खऱ्या प्रेमाच्या आणि आनंदाच्या शोधात आहे, परंतु या मार्गावर तिला विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. 15 सप्टेंबर रोजी टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 (TIFF) दरम्यान रॉय थॉम्पसन हॉलमध्ये चित्रपटाचा प्रीमियर रिलिज होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com