Sidharth Shukla: मानसिक अवस्था ठीक नसल्याने, शहनाज गिलचा फोन बंद

धक्कादायक बातमीनंतर शहनाज साध्या मानसिक धक्क्यात आहे, म्हणूनच तीचा फोन बंद असून तिच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क होत नाहीये.
Sidharth Shukla: मानसिक अवस्था ठीक नसल्याने, शहनाज गिलचा फोन बंद
Sidharth Shukla And Shehnaaz GillDainik Gomantak

लोकप्रिय अभिनेता आणि बिग बॉस 13 विजेता सिद्धार्थ शुक्ला यांचे गुरुवारी 2 सप्टेंबर रोजी मुंबईच्या कूपर रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 40 वर्षांचे होते. “त्यांना रुग्णालयात मृत आणण्यात आले होते कूपर हॉस्पिटलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या संदर्भात माहिती दिली. शहनाज गिलच्या वडिलांनी दिलेल्या माहिती नुसार, धक्कादायक बातमीनंतर शहनाज साध्या मानसिक धक्क्यात आहे, म्हणूनच तीचा फोन बंद असून तिच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क होत नाहीये. सिद्धार्थ शुक्लाच्या पश्चात आई आणि दोन बहिणी आहेत. सूत्रांनुसार, शवविच्छेदन तपासणी अद्याप अपूर्ण असल्याने अभिनेत्याचे अंतिम संस्कार आज होण्याची शक्यता आहे.

Sidharth Shukla And Shehnaaz Gill
Sidharth Shukla: सिद्धार्थचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांकडे सादर करण्यात आला

दुसरीकडे, बिग बॉस 13 चा उपविजेता असीम रियाज कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल झाला असून, सिद्धार्थच्या पोस्टमार्टम अहवालाची वाट पाहत आहे. सिद्धार्थच्या दुःखद आणि अकाली निधनाने मनोरंजन क्षेत्रामध्ये शोककळा पसरली आहे. सिद्धार्थच्या दिल से दिल तकची सहकलाकार आणि सहकारी बिग बॉस स्पर्धक रश्मी देसाईने सोशल मीडियावर तुटलेल्या हृदयाचे इमोजी शेअर करून आपले दुःख व्यक्त केले आहे.

Sidharth Shukla And Shehnaaz Gill
Sidharth Shukla: आता मी कसं जगू? सिद्धार्थच्या अचानक जण्याने शहनाज गिलला दुःख अनावर

अभिनेता देवोलीना भट्टाचारजी यांनी देखील ट्विट केले, “मी फक्त सुन्न आहे ... सिद का? खूप लवकर… तुमच्या आत्म्याला शांती लाभो मित्रा. #सिद्धार्थ शुक्ला. सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगण, कपिल शर्मा, माधुरी दीक्षित, कियारा अडवाणी, मनोज बाजपेयी, रितेश देशमुख आणि आर माधवन सारखे बॉलिवूड ए-लिस्टर्स देखील अभिनेत्याच्या अचानक आणि दुःखद निधनाने दु: खी झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com