प्रजासत्ताक दिनाच्या या पोस्टने शिल्पा शेट्टी झाली ट्रोल

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 26 जानेवारी 2021

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने केलेले ट्विट सध्या व्हायल होत आहे. हा ट्विट व्हायल होण्याचे कारणही तसेच आहे. तिने जे काही लिहिलं त्यावरुन तिला काय म्हणावे असा प्रश्न नेटक-यांनाही पडला आहे

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने केलेले ट्विट सध्या व्हायल होत आहे. हा ट्विट व्हायल होण्याचे कारणही तसेच आहे. तिने जे काही लिहिलं त्यावरुन तिला काय म्हणावे असा प्रश्न नेटक-यांनाही पडला आहे. नेटकऱ्यांनी तिची या ट्विटकरण्याहून चांगलीच कानउघाडणी केली आहे. शिल्पाला प्रजासत्ताकदिन आणि स्वातंत्र्यदिन या दोन्हीतला फरक समजलेला नाही. त्यामुळे तिने तिचे ज्ञान सोशल माध्यमांवर दाखवून दिले आहे. 

कोरोनाचा धैर्यानं सामना करत आज देश मोठ्या आनंदात प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. गेल्या काही दिवसांपासून आरोग्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी तातडीनं पावले उचलली गेली आहेत. आजच्या 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यानं शिल्पाने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तिने सोशल मीडियावर यासंबंधी एक पोस्ट शेयर केली आहे. मात्र त्यात शिल्पाने प्रजासत्ताक दिनाऐवजी स्वातंत्र्यदिन असे म्हटल्य़ाने तिला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. शिल्पा सारख्या प्रख्यात अभिनेत्रीला प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्यदिन यातला फरक समजू नये याचे वाईट वाटते. अशाप्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या आहेत. 

Tractor Parade: लाल किल्ल्यावर फडकला शेतकरी आंदोलनाचा ध्वज -

आपल्यावर टीका होत आहे हे लक्षात आल्यावर तिने ती चूक सुधारुन घेतली आहे. मात्र ट्रोलर्सने शिल्पाला चांगलेच धारेवर धरले आहे. “तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा.”असे  ट्विट शिल्पाने केले आहे.  जगातील सर्वात मोठया लोकशाहीचा देश म्हणून आपल्या भारताकडे पाहिले जाते. त्यात सर्वात शेवटच्या घटकापर्यत संविधानाची समान मुल्ये पोहचली आहेत. अशाप्रकारे देश विकासाच्या वाटेवर आहे. मात्र त्यात प्रजासत्ताक ऐवजी स्वातंत्र्य दिन असा उल्लेख केला असल्यानं शिल्पाला बोलणी ऐकावी लागली. त्यावेळी ट्रोलर्स कुठलीही पर्वा न करता तिच्यावर कडवट शब्दांचा मारा सुरु केला. अखेर शिल्पानं माफी मागून तातडीनं आपली झालेली चूक दुरुस्त केली आहे. 

‘ए मेरे वतन के लोगो’ या गाण्याचा विशालने सांगितला चूकीचा इतिहास -

दुसरीकडे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं दिल्लीत मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधवांचा गदारोळ सुरु आहे. केंद्र सरकारने शेतकरी विधेयक माघारी घ्यावे यासाठीचा हा लढा दिल्लीत सुरू आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळ पासून शेतक-यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.  कृषी कायद्याविरोधात प्रजासत्ताक दिनानिचे औचित्य साधून शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड सुरु आहे. ट्रॅक्टर परेडला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली होती. मात्र, आंदोलक शेतकऱ्यांनी निश्चित वेळेच्या आणि ठरवून दिलेल्या मार्गांपेक्षा इतर ठिकाणांच्या मार्गाहून परेड नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र तो आसफल झाल्याने अनेक ठिकाणी आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याचे दिसून येत आहे. दिल्लीतील नागलोई येथे पोलिस अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी त्यांचं ऐकण्यास तयार नव्हते. म्हणून अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी एकत्र येवून रस्त्यावरच बैठक मारली. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अशाप्रकारची घटना म्हणजे त्या दिवसाला गालबोट लागल्याचेही मत काही नेटीझन्सनं व्यक्त केलं आहे.

‘देश प्रथम’ संकल्पनेंतर्गत डिचोलीत फडकला तिरंगा -

संबंधित बातम्या