शिल्पा शेट्टी राज कुंद्राला देतेय घटस्फोट ?

शिल्पाने राजचे घर सोडले असून आता ती घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार असल्याच्या बातम्या आल्या आहेत.
शिल्पा शेट्टी राज कुंद्राला देतेय घटस्फोट ?
DivorceDainik Gomantak

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती (Bollywood actress Shilpa Shetty) आणि उद्योगपती राज कुंद्रासाठी (Industrialist Raj Kundra) मागिल काही महिन्यातील दिवस चांगले गेले नाहीत. पती राजला अश्लील व्हिडिओ प्रकरणी तुरुंगात टाकल्यानंतर शिल्पाच्या आयुष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज तुरुंगात असताना शिल्पाबाबत इंटरनेटवर अनेक प्रकारच्या बातम्या येत होत्या. शिल्पाने राजचे घर सोडले असून आता ती घटस्फोटासाठी (Divorce) अर्ज दाखल करणार असल्याच्या बातम्या आल्या आहेत.

शिल्पाच्या जवळच्या मित्राच्या वक्तव्यानंतर ही बातमी समोर आली आहे. शिल्पाच्या मैत्रिणीने सांगितले होते की, अभिनेत्रीने कठोर परिश्रमाने बॉलीवुड मध्ये हे स्थान मिळवले आहे आणि तिचा राजच्या प्रॉपर्टीशी, व्यवसायाशी काहीही संबंध नाही. मात्र सत्य अगदी उलट आहे.

Divorce
'मनीके मागे हीते' या गाण्याचं अमृता फडणवीस यांच्या आवाजातील व्हर्जन ऐकले का?

राजच्या अटकेनंतर शिल्पा खूप नाराज झाली आहे. जरी ती तिच्या पतीसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेत असली तरी ती पती राज सोबत खंबीरपणे उभी असल्याचे ती म्हणते. शिल्पाने आपल्या पतीला पाठिंबा देण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. राजची जामिनावर सुटका झाल्यानंतर शिल्पा आणि पती आरामात आनंदी जीवन जगत आहेत.

शिल्पाने राजसाठी करवा चौथ पाळणे आणि नंतर पतीसोबत हिमाचल प्रदेशातील बगलामुखी आणि ज्वाला देवी मंदिरात जाणे शिल्पाचा राज कुंद्रापासून घटस्फोट होत नाही असे दर्शवते. विशेष म्हणजे, या वर्षी जुलैमध्ये राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणी अटक करण्यात आले होते. नंतर सप्टेंबर महिन्यात राजला जामीन मिळाला आणि त्याची जामिनावर सुटका झाली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com