Shilpa Shetty च्या घरी उत्साहात 'गणरायाचे' आगमन
Shilpa ShettyDainik Gomantak

Shilpa Shetty च्या घरी उत्साहात 'गणरायाचे' आगमन

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच्या सोशल मीडिया (Social Media) हँडलवर गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मुलांसोबत काही फोटो शेयर केले आहेत.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिने वियान राज कुंद्रा आणि समिशासोबत गणपती (Ganapati) बाप्पाचे आपल्या घरी स्वागत केले दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिल्पाच्या घरी गणरायाचे आगमन केले. शिल्पा शेट्टी कुंद्राने बाप्पाचे घरी स्वागत केले असून अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया (Social Media) हँडलवर गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मुलांसोबत काही फोटो शेयर केले आहेत, या फोटोध्ये शिल्पा सोबत वियान आणि समिशा दिसत आहेत. दरवर्षी शिल्पा सोबत बाप्पाच्या तयारीसाठी राज कुंद्रा असायचे, पण या वर्षी राज कुंद्रा शिवाय शिल्पाने गणेश चतुर्थीची तयारी केली आहे.

Shilpa Shetty
Deepika Padukone का होती डिप्रेशनमध्ये? केला स्वतः खुलासा

या फोटोमध्ये, वियान आणि समिशा स्वादिष्ट मोदकांचा आनंद घेताना दिसत आहेत. आणि ते बाप्पा कडून आशीर्वाद घेत आहेत. या फोटोला शिल्पाने '' अष्ट विनायक नमो नमः! गणपती बाप्पा मोरिया! ओम गण गणपताय नमो नमः! श्री सिद्धिविनायक नमो नमः! अष्ट विनायक नमो नमः! गणपती बाप्पा मोरैया! हे कॅप्शन दिले होते.

Shilpa Shetty
कंगना राणावत राजकारणात प्रवेश करेल का? त्यावर म्हणाली...

गुलाबी रंगाच्या पारंपरिक ड्रेस मध्ये शिल्पा असून या मध्ये ती आकर्षक दिसत आहे. ती आणि तिची मुलगी समिशा यांनी न्यू ट्रेंड प्रमाणे एकसारखा ड्रेस घातला आहे. जांभळा कुर्ता आणि पांढऱ्या पायजमात वियान सुद्धा गोंडस दिसत आहे. तिने पोस्ट शेअर करताच सुझान खान, बिपाशा बसू आणि इतरांनी कमेंट्स सेक्शनमध्ये प्रेमाचा वर्षाव केला.बुधवारी शिल्पाने मुंबईच्या लालबाग गणपती कार्यशाळेतून मूर्ती घेतली. शिल्पा तीच्या मुलांसोबत उत्साहाने गणेश चतुर्थी साजरी करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पती राज कुंद्राच्या अटकेनंतर तिने तिच्या शोमधून ब्रेक घेतला. नंतर, तिने ऑगस्टमध्ये पुन्हा शूटिंगला सुरूवात केली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com