Shilpa Shetty : "गणपती बाप्पा मोरया" शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्रासोबत केलं गणेशाचं स्वागत...

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने गणेशाची मुर्ती घरी आणून बाप्पाचा उत्सव साजरा करायला सुरूवात केली आहे.
Shilpa Shetty
Shilpa ShettyDainik Gomantak

Shilpa Shetty Celebrates Ganeshotav : अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्या घरी गणेशाची मुर्ती आणून बाप्पाचा उत्सव साजरा करायला सुरूवात केली आहे.

शिल्पाच्या घरचा गणपती दिमाखात दाखल झाला असुन व्हिडीओ व्हायरल होताच शिल्पाच्या चाहत्यांनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

गणेश चतुर्थीच्या सणाला आणि गणपतीच्या आगमनाला काही तास शिल्लक राहिले असताना शिल्पाच्या घरी बाप्पाच्या स्वागताची लगबग पाहायला मिळाली.

गणेश चतुर्थी हा भारतातल्या सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या सणांपैकी एक आहे. 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवात अनेक सेलिब्रिटीही सहभागी होतात.

सलमान खान, अजय देवगनसह अनेक सेलिब्रिटी गणेशोत्सवात आपल्या कुटूंबासह सहभागी होतात.

शिल्पा तिच्या आगामी सुखी चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटात शिल्पा मातृसत्ताक कुटूंबपद्धतीवर भाष्य करणार आहे. या चित्रपटात महिला सक्षमीकरणावरही भाष्य करणार आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com