वृंदावनला पोहोचत शिल्पा शेट्टीने केली बांके बिहारीची पूजा

स्वप्न पूर्ण केल्याबद्दल हेमा मालिनी यांचे आभार मानले
shilpa shetty
shilpa shettyDainik Gomantak

आपल्या सौंदर्य आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत राहणारी तसेच नवरात्र असो वा गणेशोत्सव आपल्या धडाकेबाज अंदाजात सण साजरी करणारी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने बांके बिहारींना भेटण्यासाठी वृंदावन गाठल आहे. वृंदावनमध्ये पोहोचत तिने मंगलमय वातावरणात मंदीरात पोहोच दर्शन घेतल्याचा व्हिडीओ ही शेअर केला आहे. शिल्पाने मंदिरात सुमारे 20 मिनिटे बांके बिहारी यांची पूजा केली आणि त्यानंतर त्यांचे दर्शन घेतले आहे.

( shilpa shetty visited banke bihari after reaching vrindavan thanked hema malini for fulfilling her dream)

shilpa shetty
Sonu Sood Birthday: पंजाबच्या पोराला 'सोनू सूद' बनविण्यात विदर्भाचा मोठा वाटा...

स्वत: शिल्पा शेट्टीने तिच्या अधिकृत इन्स्टा हँडलवर बांके बिहारीला भेट दिल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा सुरक्षेदरम्यान मंदिरात जाताना दिसत आहे. मंदिराच्या आत गेल्यावर ती पूर्ण भक्तिभावाने दर्शन घेताना दिसते. याशिवाय शिल्पा राधे राधेचा जयघोष करत आहे. शिल्पाच्या मागे भक्तांचीही गर्दी आहे, जे तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत.

shilpa shetty
बिपाशा-करणने दिली गुड न्युज! लग्नाच्या 6 वर्षानंतर हलणार घरात पाळणा

स्वप्न पूर्ण केल्याबद्दल हेमा मालिनी यांचे आभार मानले

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत शिल्पा शेट्टीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ही आपली संस्कृती आणि वारसा आपल्याला जगात वेगळे बनवते. वृंदावनातील बांके बिहारी मंदिर आणि प्रेम मंदिराला भेट दिली. माझे स्वप्न पूर्ण झाले. हेमा मालिनी जी, माझे हे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तिचे केस बांधलेले आहेत आणि कपाळावर लाल टिक्का आहे ज्यामध्ये ती नेहमीसारखीच सुंदर दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com