Shiv Thakare: मुंबई पोलिसांच्या कामाला अभिवादन करण्यासाठी शिव ठाकरेचा अनोखा बाप्पा

Shiv Thackeray: मात्र त्याला देशभर ओळख बिग बॉस च्या १६ व्या सीझनमधून मिळाली.
Shiv Thakare
Shiv ThakareDainik Gomantak

Shiv Thackeray: गणेशोत्सवाची सगळीकडे धुमधाम सुरु आहे. सगळेजण गणपती घरी आणण्यासाठी उत्सुक आहेत. आता सेलेब्रिटीदेखील आपापल्या घरी गणपतीचे स्वागत करण्यास उत्सुक असल्याचे चित्र दिसून येत आहे.

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी नुकतेच आपल्या घरी गणपती बाप्पाचे मोठ्या थाटात स्वागत केले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने बिग बॉस मराठी सीझन २ आणि बिग बॉस १६ फेम शिव ठाकरे पून्हा एकदा चर्चेत आला आहे.

शिव ठाकरे मराठमोळ्या कलाकाराने पोलिसाच्या गणवेशातला गणपती बाप्पा घरी आणत मुंबई पोलिसांना ट्रिब्युट दिले आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, गणपती बाप्पाला घरी आणेपर्यंतच्या उत्सवात ५० पोलिस सामील झाले होते. त्यांनी या उत्सवाचा आनंददेखील घेतला आहे.

mumbai police with police bappa
mumbai police with police bappaDainik Gomantak

शिव ठाकरेचा अंदाज त्याच्या चाहत्यांना चांगलाच भावला आहे. शिवने मुंबई पोलिसांच्या कामाला दिलेला हा अनोखा सलामीचे त्यांनी कौतुक केले आहे. मात्र शिव पहिल्यांदाच असा अनोखा गणपती घरी आणत नाही तर त्याने २०२२ मध्येदेखील सायबर क्राइम ब्रँचला अभिवादन करणारा गणपती आणला होता.

shiv thakare
shiv thakareDainik Gomantak

शिवच्या करिअरबद्दल बोलायचे म्हटले तर, त्याची सुरुवात ही रोडिज या टीव्ही शो वरुन झाली होती. त्यानंतर तो बिग बॉस मराठी सीझन २ चे विजेतेपद स्वत: च्या नावावर कोरले होते. मात्र त्याला देशभर ओळख बिग बॉस च्या १६ व्या सीझनमधून मिळाली.

आता तो रिअॅलिटी शो खतरों के खिलाडीमध्ये दिसून येत आहे. काही म्युझिक व्हिडिओमध्येदेखील तो दिसून आला आहे. सोशल मिडियावर तो अॅक्टीव्ह असल्याचे दिसून येते. तो आपल्या मित्रमैत्रीणींबरोबर इन्जॉय करतानादेखील दिसून येतो. आता शिवला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com